🧐 'आता फेसबुक, ट्विटर' ची करता येणार तक्रार - केंद्र सरकारची मोठी घोषणा
Breaking Update
✒️ केंद्र सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची तक्रार करण्यासाठी तक्रार समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला.
⏲️ त्यामुळे यापुढे आपल्याला फेसबुक आणि ट्विटर सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मबाबत तक्रार करता येणार आहे - पुढील तीन महिन्यांमध्ये सरकार तक्रार समिती स्थापन करणार आहे.
🤷♀️ काय सांगितले केंद्र सरकारने
▪️ केंद्र सरकारने शुक्रवारी 28 ऑक्टोबर रोजी याबाबत एक अधिसूचना जारी केली आहे. फेसबुक आणि ट्विटरवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे
▪️ या तक्रार समितीमध्ये एक अध्यक्ष आणि केंद्र सरकारद्वारे नियुक्त केलेले दोन सदस्य असतील. दोन सदस्य पूर्णवेळ कार्यरत असतील.
▪️ सुधारित नियमांनुसार, टेक कंपन्यांना 24 तासांच्या आत युजर्सच्या तक्रारी स्वीकाराव्या लागतील. माहिती, पोस्ट किंवा सूचना काढून टाकण्याची विनंती केल्यास ते 72 तासांत कंपनीला ही समस्या सोडवावी लागेल - अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत
😇 फेसबुक, ट्विटर' ची तक्रार करता येणार - हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा
Comments