🚌 एसटी महामंडळाचा मोठा निर्णय - आता प्रवाशांना समजणार बसचे करंट लोकेशन
Government Update
🧳 राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांसाठी आता 'व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम' यंत्रणा सुरु करणार आहे. त्यामुळे प्रवाशांना संबंधित एसटीचे करंट लोकेशन समजण्यास मदत होणार आहे.
⏱️ तसेच यामुळे प्रवाशांना एसटी सुटण्याची आणि पोहोचण्याची वेळही समजू शकेल.
🤷♀️ कसे समजणार करंट लोकेशन ?
📺 एसटी महामंडळातर्फे प्रत्येक आगारांमध्ये डिस्प्ले बोर्ड बसविले असून, लवकरच ते कार्यान्वित केले जातील. त्यावर प्रवाशांना आपली एसटी नेमकी कुठे आहे, याचे लोकेशन समजेल.
🚍 याशिवाय, एसटीला अपघात झाल्यास, या यंत्रणेमुळे तात्काळ मदतही करता येईल. प्रायोगिक तत्त्वावर काही गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसविण्यात आली आहे.
🗣️ तर येत्या काही दिवसांत सर्व गाड्यांमध्ये 'व्हीटीएस' प्रणाली बसविणार आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली.
😇 एसटी प्रवाशांना आता बसचे करंट लोकेशन समजणार - हि माहिती आपण इतर प्रवाशांना देखील शेअर करा
Comments