👨💻 PM किसान सन्मान निधीचे पैसे मिळाले नाहीत - येथे करा तक्रार
Knowledge Update
🧐 केंद्र सरकारने आज PM किसान सन्मान निधीच्या 12 व्या हप्त्याचे 2000 रुपये हस्तांतरित केले आहेत. जर तुमच्या खात्यावर पैसे आले नसतील तर काय करायचे ? तसेच तक्रार करायची कुठे? ते आपण या मॅसेज मध्ये जाणून घेऊया.
✍️ सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की कोणत्या कारणांमुळे पीएम किसानचा हप्ता बँक खात्यात आला नसेल.
👉 कारणे - पीएम किसान योजनेत नोंदणी करताना कोणतीही माहिती, चुकीचा पत्ता किंवा बँक खात्याची माहिती भरण्यात चूक झाल्यास हप्ता येणार नाही.
● राज्य सरकारकडून करेक्शन पेंडिंग असणे तसेच एनपीसीआयमध्ये आधार सीडिंग नसेल तर सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणाली रेकॉर्ड स्वीकारत नाही.
● किंवा बँकेची रक्कम अवैध असली तरी योजनेचे पैसे येत नाहीत.
📝 येथे तक्रार करा
📱 तुमचं नाव यादीत असेल आणि तुम्ही दिलेली सर्व माहिती बरोबर असूनही बँक खात्यात पैसे आले नाही, तर तुम्ही या टोल फ्री क्रमांक 011-24300606 आणि हेल्पलाइन क्रमांक 155261 वर कॉल करून तक्रार नोंदवू शकता
🖊️ तसेच आपल्याला pmkisan-ict@gov.in या ई-मेल आयडीवर ईमेल लिहून मदत मिळवू शकता
😇 सर्व शेतकऱ्यांसाठी - हि बातमी खूप महत्वाची आहे , आपण इतरांना देखील शेअर करा
Comments