🚆 आता विनापैसे तिकीट बूक करुन करता येणार रेल्वे प्रवास - प्रवाशांसाठी आनंदाची बातमी
Railway Update
🧐 दिवाळीच्या सुटीत पर्यटनाचा विचार असेल, तर तुमच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. इंडियन रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार प्रवाशांना यंदाच्या दिवाळीत एकही पैसा न देता तिकीट बूक करुन देशभर फिरता येणार
📝 यासाठी ‘आयआरसीटीसी’ ने ‘ट्रॅव्हल नाऊ – पे लेटर’ ही सुविधा सुरु केली आहे. ‘आयआरसीटीसी’च्या ‘रेल कनेक्ट’ अॅपवरही ही सुविधा उपलब्ध आहे.
💫 रेल्वेच्या या नव्या सुविधेमुळे खिशात पैसे नसले, तरी प्रवाशांना तिकीट बूक करता येईल त्यासाठी रेल्वेने ‘CASHe’ सोबत भागीदारी केली आहे.
💁♂️ असे करा तिकिट बूक
▪️ सर्वप्रथम ‘गुगल प्ले-स्टोअर’वरुन ‘आयआरसीटीसी’चे ‘रेल कनेक्ट’ हे अॅप डाउनलोड करा - नंतर अॅपवर ‘ट्रॅव्हल नाऊ, पे लॅटर’ या पर्यायावर क्लिक करुन रेल्वेचे रिझर्व्ह तिकिट बुकींग करता येईल.
▪️ एकदा हा पर्याय निवडल्यावर आरक्षित अथवा तात्काळ तिकिट बुकींगचा पर्याय खुला होईल. त्यानंतर प्रवाशाला चेकऑऊट पेजवर किती हप्त्यात ही रक्कम चुकती करायची आहे, त्याची निवड करता येईल
▪️ रेल्वे तिकिटांची रकमेची परतफेड प्रवाशांना सुलभ 3 ते 6 हप्त्यांमध्ये (ईएमआय) करता येईल. असे ‘CASHe’ चे चेअरमन व्ही. रमन कुमार यांनी म्हणाले
आता बिनपैसे रेल्वे प्रवास करता येणार - हि बातमी रेल्वे प्रवाशांसाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा
Comments