🏦 RBI चा मोठा निर्णय ! - देशात येणार नवीन डिजिटल चलन
Breaking Update
🧐 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशात खूप खास डिजिटल चलन आणणार असल्याचे जाहीर केले आहे - रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या कन्सेप्ट पेपरमध्ये या चलनाविषयी माहीती दिली आहे.
🖊️ या चलनाला ई-रुपया असं म्हटलं जात आहे. हे डिजिटल चलन काही ठराविकचं बाबींसाठीच वापरलं जाणार आहे. ई-रुपयाच्या जनजागृतीसाठी आरबीआयने कन्सेप्ट नोट जाहीर केली आहे.
💁♂️ आणखी काय सांगितले RBI ने ?
▪️ हा ई-रुपया ठराविक गोष्टींसाठी वापरला जाणार असून याच्या वेळोवेळी येणाऱ्या अपडेट्स, नव्या प्रणालीच्या वापराबाबत आणि फायद्यांबाबत आरबीआयकडून यापुढेही सांगितलं जाणार आहे.
▪️ सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणजे सीबीडीसी हे चलनाचे एक डिजिटल रूप आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रुवारी 2022 रोजी मांडलेल्या अर्थसंकल्पात डिजिटल रुपया लॉन्च करण्याची घोषणा केली होती.
▪️ सध्या Central Bank Digital Currency दोन वेगवेगळ्या स्वरुपात असणार असल्याचं आरबीआयने म्हटलं आहे. आरबीआयच्या ट्विटर अकाऊंट वर बँकेने ही कन्सेप्ट नोट सादर केली आहे.
📍 दरम्यान याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू
😇 देशात नवीन डिजिटल चलन येणार - हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा
Comments