🧐 महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर - 18 डिसेंबरला मतदान
Election Update
✌️ राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे - निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील विविध जिल्ह्यांत ग्रामपंचायतींच्या सदस्यपद आणि सरपंचपदाच्या निवडणुकीचा निर्णय घेतला आहे .
ग्रामपंचायतींच्या 7 हजार 751सरपंच निवडणुकीसाठी १८ डिसेंबर २०२२ ला मतदान होणार आहे - त्यासाठी संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. या निवडणुकीचा निकाल २० डिसेंबर २०२२ ला समोर येईल, असे राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी सांगितले आहे.
🤔 निवडणुकीचा कार्यक्रम असा असेल
▪️ नव्याने स्थापित सर्व ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 नोव्हेंबर 2022 रोजी संबंधित तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील.
▪️ नामनिर्देशनपत्र 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 या कालावधीत दाखल करण्यात येतील.
▪️ नामनिर्देशनपत्रांची छाननी 5 डिसेंबर 2022 रोजी होईल.
▪️ नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत 7 डिसेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल व त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल.
▪️ मतदान 18 डिसेंबर 2022 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल.
▪️ नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असेल.
▪️ मतमोजणी 20 डिसेंबर 2022 रोजी होईल.
🤔 कोणत्या जिल्हा व तालुक्यात निवडणुका होणार
अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड , भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, धुळे गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नंदुरबार, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशीम, यवतमाळ, नांदेड व नाशिक इत्यादी ठिकाणी निवडणुका होतील.
😇 महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका - हि बातमी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा
Comments