🔖 आता एका वर्षात करता येणार 4 वेळा मतदान नोंदणी - निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Government Update
🧐 निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार , मतदान नोंदणीसाठी एक विशेष मोहीम सुरू करण्यात येणार आहे.
✒️ यामुळे ज्या नागरिकांचे 18 वर्षे वय येत्या काही दिवसांत पूर्ण होणार आहे त्यांनादेखील आगाऊ नोंदणी करता येणार आहे.
🤷♀️ कोणत्या तारखेला करता येणार नोंदणी ?
▪️ येत्या 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 या विशेष मोहिमेंतर्गत ज्या नागरिकांचे वय 17+ असेल असे नागरिक आगाऊ मतदार नोंदणी करू शकणार आहेत.
▪️ येत्या 9 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर 2022 दरम्यान निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबवली जात आहे.
▪️ राज्यातील नागरिकांना 31 मे 2023 पर्यंत ग्रामपंचायत निवडणुकांसाठी मतदार नोंदणी पूर्ण करणे गरजेचे आहे.
👉 आता एका वर्षात 4 वेळा मतदार नोंदणी करता येणार
👩🏫 तुम्हाला माहिती असेल, मतदार नोंदणी करताना यापूर्वी 1 जानेवारी या तारखेला किंवा त्याआधी ज्या नागरिकांची वय 18 वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांनाच मतदार नोंदणी करता येत होती.
⏲️ मात्र आता 2023 पासून 1 जानेवारी, 1 एप्रिल, 1 जुलै, 1 ऑक्टोबर या तारखेला किंवा त्यापूर्वी 18 वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना मतदान नोंदणी करता येणार , अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे.
🙏 आता एका वर्षात 4 वेळा मतदान नोंदणी करता येणार - हि माहिती आपण इतरांना देखील शेअर करा
Comments