आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाहि मिळणार निर्वाह भत्ता - उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा Breaking Update
💰 आता मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाहि मिळणार निर्वाह भत्ता - उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची मोठी घोषणा
Breaking Update
🧐 आता एससी/एसटी/ओबीसी या प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाहि सामाजिक न्याय विभागाच्या निकषानुसार 60 हजार रुपये निर्वाह भत्ता मिळणार आहे.
🗣️ असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे
🤷♀️ आणखी काय सांगितले चंद्रकांत पाटील यांनी ?
▪️ डिसेंबरपासून मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी 100 मुलांचे वसतीगृह सुरु करावे, अशा सुचना सारथी संस्थेला दिल्या.
▪️ तसेच केंद्र सरकारच्या एनसीईआरटीमार्फत घेतल्या जाणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तीर्ण झालेले व शिष्यवृत्ती न मिळालेल्या लक्षित गटातील विद्यार्थ्यांना सारथीमार्फत दरमहा 800 रुपये प्रमाणे -
▪️ वार्षिक 9 हजार 600 रुपये लाभ देणारी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्यात आली आहे. याचबरोबर देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी डॉ. पंजाबराव देशमुख सारथी योजना सुरू करण्यात आली आहे.
▪️ या योजनेअंतर्गत देशातील 200 नामांकित राज्याबाहेरील विद्यापीठ/संस्थांमध्ये प्रवेश घेणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना ज्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 8 लाख इतक्या मर्यादेत आहे अशा विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
🤔 पहा कोणत्या सुविधा मिळणार - या योजनेंतर्गत अभ्यासक्रम व शैक्षणिक साहित्य याकरिता रुपये 50 हजार रुपये देण्यात येणार असून विद्यापीठाने निर्धारित केलेल्या शैक्षणिक शुल्क, परीक्षा शुल्क, नोंदणी फी ची प्रतिपूर्ती आणि वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृह व भोजन शुल्क रक्कम अदा करण्यात येणार आहे.
▪️ याव्यतिरिक्त मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थीं उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, म्हणून ओबीसी विद्यार्थ्यांना लागू असलेल्या शिष्यवृत्तीप्रमाणे पदव्युत्तर पदवीसाठी -
▪️ प्रती वर्षी रुपये 30 लाख मर्यादेत आणि पीएचडी साठी रुपये 40 लाखाच्या मर्यादेत परदेशी शिष्यवृत्ती योजना सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला - अशी ,माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.
😇 आपण प्रत्येकाने थोडस सहकार्य करा - हि माहिती इतरांना नक्की शेअर करा
Comments