😱 आजपासून देशात DIGITAL RUPEE ची सुरुवात जाणून घ्या फायदे
Banking Update
💰गेल्या अनेक महिन्यांपासून आरबीआयच्या डिजिटल करन्सीबाबत चर्चा सुरु होती . अखेर आज 1 नोव्हेंबरपासून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया डिजिटल रुपीचा प्रोजेक्ट सुरू होत आहे
यासाठी एकूण 9 बँकांची निवड करण्यात आली आहे - डिजिटल रुपयाला रिझर्व्ह बँकेचे दायित्व असेल
💁♂️ जाणून घ्या सविस्तर माहिती
▪️ सुरवातीला समजून घ्या , फिजिकल नोटची सर्व वैशिष्ट्ये डिजिटल रुपयांमध्ये उपलब्ध असतील - तसेच डिजिटल रूपीचे चलनी नोटात रूपांतर देखील करता येईल
▪️ महत्वाचे म्हणजे UPI शी देखील डिजिटल रुपी जोडला जाईल - जेणेकरून लोक पेटीएम, फोनपे सारख्या इतर महत्त्वाच्या वॉलेटसह व्यवहार करू शकतील
▪️ तसेच डिजिटल रुपया ही बँकांची जबाबदारी नसून ती रिझर्व्ह बँकेची जबाबदारी असेल - म्हणजे रिझर्व्ह बँकेची सुरक्षितता असेल
▪️ डिजिल रुपीमुळे नोटांची छपाई, बँकांच्या शाखा, एटीएमपर्यंत पोहोचवण्याचा खर्च वाचणार - एका आर्थिक वर्षात रिझव्र्ह बँकेला केवळ नोटा छापण्यासाठी सुमारे 5 हजार कोटी रुपये खर्च करावे लागतात
📣 आजपासून देशात डिजिटल रुपीची सुरवात होत आहे हि बातमी महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा
Comments