🚆 रेल्वेमध्ये महिलांसाठी राहणार राखीव सीट - रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा
Railway Update
🚂 भारतीय रेल्वेने महिला प्रवाशांसाठी लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाडीत यापुढे सहा जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबतची घोषणा केली.
👴🏻 यामध्ये वरिष्ठ नागरिकांसह, 45 वर्षांवरील महिला, तसेच गर्भवतीसाठी सहा बर्थ आरक्षित असतील दरम्यान ट्रेन, मेल किंवा एक्स्प्रेसमधील बोगीच्या संख्येच्या आधारे महिलांसाठी राखीव बर्थची संख्या ठरवली जाईल - असेही ते म्हणाले
🤷♀️ कोणत्या गाड्यांमध्ये मिळणार हि सुविधा ?
🛤️ लांब पल्ल्याच्या मेल , एक्स्प्रेस ट्रेनमध्ये स्लीपर क्लास कोचमध्ये महिलांसाठी सहा बर्थ राखीव असतील. तसेच गरीब रथ, राजधानी व दुरांन्तोसह वातानुकूलित एक्स्प्रेस ट्रेनच्या थर्ड एसी कोचमध्येही महिलांसाठी सहा बर्थ आरक्षित असतील.
👮🏻 याशिवाय महिलांच्या - सुरक्षेसाठी रेल्वेत विशेष व्यवस्था केली आहे. यामध्ये आरपीएफ, जीआरपी आणि जिल्हा पोलिस प्रवाशांना चांगली सुरक्षा देतील - असेही रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले.
😇 रेल्वेमध्ये महिलांसाठी राखीव सीट राहणार - हि बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे, आपण इतरांना देखील शेअर करा
Comments