Skip to main content

Posts

😱 शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी ! - पीएम किसान योजनेत मोठा बदल Farmer Update

😱  शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी ! - पीएम किसान योजनेत मोठा बदल  Farmer Update 🧐 केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल केला आहे -  🤷‍♂️  काय बदल झाला ? - यापूर्वी शेतकऱ्यांना त्याचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्डच्या मदतीने लाभार्थी स्थिती पाहता येत होती  ✒️ मात्र आता सरकारने ही पद्धत बदलली त्यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान पोर्टलवर जाऊन आधार क्रमांक टाकून लाभार्थी स्टेटस पाहता येणार नाही तर आता शेतकऱ्यांना स्टेटस पाहण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकणे आवश्यक असणार आहे. 👉 असे पाहता येईल स्टेटस - pmkisan.gov.in वेबसाईटवर जा. डावीकडील लहान बॉक्समध्ये Beneficiary Status (लाभार्थी स्टेटस) वर क्लिक करा. ▪️ त्यांनतर नोंदणी क्रमांक टाकून तुमचे स्टेटस चेक करा. जर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहीत नसल्यास, Know Your Registration Number यावर क्लिक करा. ▪️ नंतर पीएम किसान खात्यावर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका. यानंतर, कॅप्चा कोड भरा आणि Get Mobile OTP वर क्लिक करा. ▪️ यासोबतच बॉक्समध्ये तुमच्या नंबरवर मिळालेला OTP टाका आणि Get Detail...

👌 आता ३१ डिसेंबर पर्यंत मिळणार पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ - रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर Govt. Update

👌 आता ३१ डिसेंबर पर्यंत मिळणार पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ - रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर Govt. Update 💫 तुम्हाला माहिती असेल, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला यायाधी ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती - मात्र आता मोदी सरकारने या योजनेला पुन्हा एकदा 3 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.  ⏲️ त्यामुळे गोरगरीब जनतेला आता डिसेंबर-2022 पर्यंत मोफत अन्नधान्य मिळणार आहे - असे काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले 📍  पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा - लाभ आता डिसेंबर-2022 पर्यंत मिळणार, हि बातमी आपण इतरांना देखील शेअर करा

⛽ सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी ! - आता वर्षभरात मिळणार फक्त 15 सिलिंडर Breaking Update

⛽  सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी ! - आता वर्षभरात मिळणार फक्त 15 सिलिंडर Breaking Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, यापूर्वी विनाअनुदानित घरगुती गॅस कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांना केव्हाही आणि वर्षभर लागलीत तेवढे सिलिंडर घेता येत होते. मात्र आता घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत.  ✒️ नव्या नियमानुसार, ग्राहकाला वर्षभरात केवळ 15 सिलिंडरच मिळतील - तसेच एक महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला असून ग्राहकांना महिन्यात दोन पेक्षा जास्त सिलिंडर घेता येणार नाहीत - असेहि केंद्र सरकारने म्हटले आहे  🤷‍♂️  आणखी काय सांगितले केंद्र सरकारने ?  💫 अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची नोंदणी असणाऱ्या ग्राहकांना वर्षभरात १२ सिलिंडर मिळतील. तर यापेक्षा जास्त सिलिंडरची आवश्यकता असेल तर ग्राहकांना विनाअनुदानित सिलिंडर घ्यावे लागणार आहेत. 📝 रेशनिंग अंतर्गत एक ग्राहक महिन्यात फक्त दोन घरगुती गॅस सिलिंडर घेऊ शकतो. एखाद्या ग्राहकाला जास्त सिलिंडर लागत असल्यास त्याचा पुरावा देऊन तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्यानंतरच अतिरिक्त रिफिल मिळेल. 🙏  आता वर्षभरात फक्त...

👌 ‘पासपोर्ट’ बनवण्याच्या नियमामध्ये होणार मोठा बदल - प्रत्येकाने वाचा Informative Update

👌  ‘पासपोर्ट’ बनवण्याच्या नियमामध्ये होणार मोठा बदल - प्रत्येकाने वाचा Informative Update ✒️ तुम्हाला माहिती असेल, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट’ असल्याशिवाय ‘पासपोर्ट’ दिला जात नाही. पासपोर्ट काढताना ‘पीसीसी’ ही एक महत्वाची प्रक्रिया आहे.  📍 निवासी स्थिती, रोजगार किंवा दीर्घकालीन व्हिसा, इमिग्रेशनसाठी अर्ज करताना ‘पोलिस व्हेरिफिकेशन’ आवश्यक असत - मात्र आता परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट बनवण्याच्या नियमामध्ये मोठा बदल केला आहे  🤔  पहा काय सांगितले परराष्ट्र मंत्रालयाने ?  ▪️ पासपोर्टसाठी अनिवार्य असलेल्या ‘पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट’साठी अर्जदारांना आता ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये अर्ज करता येणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलं आहे.  ▪️ यासाठी मंत्रालयाने भारतातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांना ‘पीसीसी’ साठी अर्ज करण्याच्या सुविधेसह जोडण्याचा निर्णय घेतला आहे. ▪️ त्यामुळे पासपोर्ट अर्जदार आता ‘पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट’ साठी पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रावर ऑनलाइन अर्ज करू शकतात.  👉  आपण थोडस सहकार...

🎯 आता वन कर्मचाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार लाभ - राज्य सरकारचा मोठा निर्णय Breaking Update

  🎯 आता वन कर्मचाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार लाभ - राज्य सरकारचा मोठा निर्णय Breaking Update 🧐 वन कर्मचाऱ्यांना आता पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 🤷‍♂️ पहा काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार ? ● वन विभागाच्या प्रस्तावानुसार, वनांचे व वन्य प्राण्यांचे संरक्षण करताना दुर्दैवाने वन कर्मचारी मृत्युमुखी पडल्यास अशा मृत वन कर्मचाऱ्याच्या वारसास रु. 25 लाख सानुग्रह अनुदान देण्यात येईल.  ● तसेच कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर प्राधान्याने नोकरी देण्यात येईल. जर वारस नोकरी करण्यास सक्षम नसेल किंवा वारसाने नोकरी नाकारली - ● तर सदर मृत वन कर्मचाऱ्याच्या नियत सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतचे वेतन सदर कुटुंबाला देण्यात येईल. याचबरोबर कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या पार्थिवाचे कुटुंबाने ठरवलेल्या ठिकाणपर्यंतचे रस्ते/रेल्वे/विमान इत्यादी मार्गे वहन करण्याचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल. ● याव्यतिरिक...

🔖 उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! - राज्यात लवकरच 20 हजार जागांसाठी होणार पोलीस भरती Breaking Update

🔖 उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! - राज्यात लवकरच 20 हजार जागांसाठी होणार पोलीस भरती Breaking Update 🖊️ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे - राज्यातील पोलिस दलात पुढील 2 वर्षात 20 हजार जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.  🗣️ यापूर्वी पोलिस दलात सात ते आठ हजार जागांची भरती करण्याबाबत जाहीरात काढली होती. त्यात आता आणखी 12 हजार जागांची भर पडणार असून, लवकरच या भरतीची जाहीरात काढली जाईल - असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले  🤷‍♂️  काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?  🕹️ ‘राज्यात अनेक सायबर गुन्हे घडत आहेत. फिशिंगच्या माध्यमातून लोकांना लुटले जात आहे, त्यांना त्रास दिला जातोय. यासाठी सरकार योग्य ती कारवाई करीत असून,  🕵️‍♀️ राज्यात लवकरच सायबर सिक्युरीटीचे रोबस्ट इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार आहोत - त्यासाठी राज्यात लवकरच पोलीस दलात 20 हजार जागांसाठी भरती होणार आहे  📌  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  - यांनी केलेली हि घोषणा सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा

आता घरबसल्या पाहता येणार हवामान अपडेट - पहा सविस्तर Informative Update

🌍  आता घरबसल्या पाहता येणार हवामान अपडेट - पहा सविस्तर   Informative Update 🧐 देशात बदलत्या हवामानानुसार कुठे पाऊस तर कुठे ऊन अशी परिस्थिती यंदा काही दिवसांपूर्वी दिसली. दोन ते तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवरात्रीत अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण -  ✒️ तर काही ठिकाणी पावसाने जोर धरला आहे - यामुळे जर आपल्याला हवामानाची स्थिती जाणून घ्यायची असेल, तर काही मोबाईल ॲप्स आपल्याला मदत करतील चला तर जाणून घेऊ. 🔰  १. Weather - Live & forecast  - हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर फ्रीमध्ये उपलब्ध आहे. या अँप मध्ये तुम्हाला रोजचे तापमान, अंदाजात्मक हवामान बदल माहिती मिळते   🔰  २. Weather & Radar India  - हे अ‍ॅप देखील स्टोअरवर फ्रीमध्ये उपलब्ध आहे - यामध्ये हवामान थेट रडार नकाशे, मान्सून पावसाचा अंदाज, फार्म वेदर, 7 ते 14 दिवसांचा लोकल वेदर फोरकास्ट यांसारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. 🔰  ३. Weather Apps - Weather Live  - हे अ‍ॅप तुम्हाला सध्याच्या ताज्या वेळेचा हवामान अंदाज देते. तसेच यामध्ये लोकल व नॅशनल असे दोन पर्याय दिलेले आहेत. इथून प्रत...

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी - 1 ऑक्टोंबरपासून बदलणार ‘हे’ नियम Breaking Update

😱  सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी - 1 ऑक्टोंबरपासून बदलणार ‘हे’ नियम  Breaking Update 🧐 येत्या 1 ऑक्टोंबरपासून बँकेशी संबंधित व इतर अनेक नियमात बदल होणार आहे. या बदलाचा सर्वसामान्य नागरीकांच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे. हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे  💳   १. डेबिट-क्रेडिट कार्डच्या  - नियमामध्ये बदल होणार आहे, यामध्ये जेव्हा आपण कार्डने व्यवहार करतो, तेव्हा त्याचे तपशील कंपनीच्या सर्व्हरमध्ये सेव्ह व्हायचे. म्हणजे आपण एकदा कार्डची माहिती सेव्ह केल्यांनतर फक्त सीव्हीव्ही टाकून पेमेंट करता येत होते  ▪️ मात्र आता यामध्ये बदल होणार आहे -  त्यामुळे ग्राहकांना पेमेंट कंपन्यांना आता कार्डच्या बदल्यात एक पर्यायी कोड द्यावा लागेल, ज्याचे नाव टोकन आहे. हे टोकन युनिक असतील आणि तेच टोकन एकाहून अधिक कार्डांसाठी काम करेल. ▪️ याची अंमलबजावणी झाल्यानंतर, ऑनलाइन पेमेंटसाठी, थेट कार्ड वापरण्याऐवजी, एक अद्वितीय टोकन वापरावे लागेल. 💰  २. अटल पेन्शन योजनेमध्ये  - बदल होणार, नवीन नियमांनुसार आता आयकर भरणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.  📈 ...

RBI ची मोठी घोषणा ! - 500 रुपयांच्या नोटेत होणार मोठा बदल Banking Update

😱  RBI ची मोठी घोषणा ! - 500 रुपयांच्या नोटेत होणार मोठा बदल  Banking Update ✒️ रिजर्व बॅंक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, 500 रुपयांच्या नोटांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 500 रुपयांच्या नोटा साठवून ठेवणाऱ्यांनी नोटांमध्ये कोणता बदल होईल हे जाणून घेणं गरजेचे आहे. 💁‍♂️  पहा काय बदल होणार ?  ● देशभरात चलनात येणाऱ्या नोटांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा खुलासा केला आहे. देशातील दृष्टिहीन लोकांसाठी रुपया आणि नाणी अधिक अनुकूल बनवण्याचे मार्ग सुचवण्यास न्यायालयाने तज्ञांना सांगितले आहे.  ● यामध्ये 500 रुपयांच्या नोटांचाही समावेश आहे - या बदलामुळे दृष्टिहीन लोकांना नोट सहज ओळखता येईल. 👉  MANI App  - तुम्हाला माहिती असेल, RBI ने नोटा ओळखण्यासाठी MANI App तयार केले आहे - अंध लोकांना नोटा ओळखण्यात येणाऱ्या अडचणी दूर करणे हा त्यामागचा उद्देश होता. ● यापूर्वी या अँपमध्ये फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषा उपलब्ध होती. मात्र आता हे App उर्दू, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये उपलब्ध असेल.  ●...

🧐 रेशन कार्ड-धारकांसाठी महत्वाचा निर्णय - मोफत अन्न योजनेत होणार मोठा बदल Govt. Update

🧐  रेशन कार्ड-धारकांसाठी महत्वाचा निर्णय - मोफत अन्न योजनेत होणार मोठा बदल  Govt. Update 🙂 तुम्हाला माहिती असेल, कोरोना काळात केंद्र सरकारने ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्नयोजना’ सुरु केली होती. मात्र सरकारी तिजोरीवर मोठा ताण येत असल्याने मध्यंतरी ही योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा झाली होती.  🖊️ पण आतापर्यंत सातत्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात आली. सध्या फ्री रेशन योजनेची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत आहे. या योजनेला आणखी 3 ते 6 महिने मुदतवाढ दिली जाणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे  🗣️ दरम्यान हि योजना सुरु असताना या योजनेत मोठा बदल करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे सांगितले जात आहे  💁‍♂️  पहा काय बदल होणार ?  📙 आगामी काळात मोफत अन्न-धान्याऐवजी लाभार्थींच्या खात्यावर थेट ‘डीबीटी’ च्या माध्यमातून पैसे जमा करण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. अर्थात, ‘रेशन की पैसे’ याची निवड करण्याची मुभा लाभार्थांना असणार आहे. 👩‍💻 सध्या या प्रस्तावावर चर्चा सुरू असून, पुढील आर्थिक वर्षात हे बदल होऊ शकतात - दरम्यान याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या...

आता WhatsApp कॉल कारणासाठी द्यावे लागतील अतिरिक्त पैसे - जाणून घ्या सविस्तर. Important Update

🪀  आता WhatsApp कॉल कारणासाठी द्यावे लागतील अतिरिक्त पैसे - जाणून घ्या सविस्तर Important Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, आतापर्यंत WhatsApp कॉल कारणासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस द्यावे लागत नव्हते  😱 मात्र यापुढे व्हॉट्सएप कॉल करण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील - यासाठी केंद्र सरकारने दूरसंचार विधेयकाचा मसुदा प्रसिद्ध केला आहे  🤷‍♂️  पहा कसे आहे विधायक  ▪️ व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून कॉल किंवा मेसेज पाठवण्याची सुविधा दूरसंचार सेवा मानली जाईल, अशी तरतूद या विधेयकात आहे. त्यासाठी या कंपन्यांना परवाना घ्यावा लागणार आहे ▪️ देशातील दूरसंचार कंपन्या व्हॉट्सअॅप ,फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना मेसेजिंग किंवा कॉलिंग सेवा पुरवली जात आहे, जी दूरसंचार सेवेअंतर्गत येत असल्याचे सांगत आहेत.  ▪️ तसेच 20 ऑक्टोबरपर्यंत या विधेयकातील तरतुदींबाबत लोक आपली मते मांडून हे विधेयक संसदेत मांडले जाईल - त्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल , असे दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले  📍 दरम्यान चार्जेस किती व कसे लागतील याविषयी काही अपडेट आले तर आम्ही तुमच...

🔖 ड्रायव्हिंग लायसन्स बाबत नव्या गाईडलाईन्स जारी - प्रत्येकाने वाचा

🔖 ड्रायव्हिंग लायसन्स बाबत नव्या गाईडलाईन्स जारी - प्रत्येकाने वाचा  Govt. Update 🧐 केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मान्यताप्राप्त ‘ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स’ आणि ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ बाबत नव्याने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत 🤷‍♂️ कशा आहेत गाईडलाईन्स ? ✍️ रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निवेदनानुसार, ‘मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स’ची मान्यता आता केवळ 5 वर्षांसाठी असणार आहे.  🗣️ त्यानंतर ट्रेनिंग सेंटरला आपली मान्यता पुन्हा एकदा ‘रिन्यू’ करावी लागणार - असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे  👉 २. गाईडलाईन्स - आता कोणत्याही नागरिकाच्या नावे ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ जारी करण्यापूर्वी प्रशिक्षणार्थीला ‘ड्रायव्हिंग टेस्ट’मध्ये उत्तीर्ण व्हावंच लागणार आहे.  🚗 तसेच ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सना लोकांना सहज सेवा मिळावी, यासाठी ‘ट्रेनिंग सेंटर्स’शी संबंधित सेवा शुल्काची माहिती द्यावी लागेल - असेही स्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 🙏 दरम्म्यान ड्रायव्हिंग लायसन्स बाबत - जारी केलेले हे नवे न...

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - शेतजमीनच्या खरेदी-विक्रीच्या नियमात होणार मोठे बदल Farmer Update

📣   शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - शेतजमीनच्या खरेदी-विक्रीच्या नियमात होणार मोठे बदल  Farmer Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, राज्यातील शेतकऱ्यांना ‘तुकडेबंदी-तुकडेजोड कायदा 1947’ नुसार, जिरायती जमीन ही 2 एकरांपेक्षा कमी असल्यास, तर बागायती जमीन ही 20 गुंठ्यांपेक्षा कमी असली, तरी विकता येत नव्हती 🚫 विशेष म्हणजे, 2 एकरांच्या गटातील 5 ते 6 गुंठे जमीनही विकता येत नव्हती. त्यामुळे  भांडण-तंटे वाढले होते. मात्र आता ही बाब लक्षात आल्यानंतर राज्य सरकारने शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे ✒️ दरम्यान या निर्णयाची अमलबजावणी ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे -  💁‍♂️  पहा कसे आहेत नियम 👉 नव्या प्रस्तावानुसार, आता ‘तुकडेबंदी-तुकडेजोड कायदा 1947’ मध्ये बदल केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 2 एकर जिरायती शेतीऐवजी 20 गुंठे, तर बागायती जमिनीसाठी 20 गुंठ्याऐवजी 5 गुंठ्यांची मर्यादा ठरवून दिली जाणार आहे.  🗣️ त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना जमिनीचे व्यवहार करणं सोप्पं होणार - असे राज्य शासनाने म्हटले आहे  😇  शेतजमीनच्या खरे...

गाडीतील ‘सीट बेल्ट’ बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय - प्रत्येकाने वाचा Govt. Update

🧐  गाडीतील ‘सीट बेल्ट’ बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय - प्रत्येकाने वाचा  Govt. Update ✍️ कारमध्ये मागच्या सीटवर बसणाऱ्या नागरिकांनाही आता ‘सीट बेल्ट’चा वापर बंधनकारक करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.  📙 या नवीन नियमावर 5 ऑक्टोबरपर्यंत सर्वसामान्य नागरिकांची मतं मागवली जाणार आहेत. तसेच नागरिकांच्या सूचनांनुसार, नवे नियम लागू केले जाणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे 🤷‍♂️  पहा कसे आहेत नियम ▪️ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, वाहन निर्मात्या कंपन्यांना वाहनांच्या मागच्या ‘सीट बेल्ट’साठी ही ‘अलार्म’ लावण्यास सांगितलं आहे. मंत्रालयाकडून त्यासाठीचे ‘ड्राफ्ट नोटिफिकेशन’ जारी करण्यात आलं आहे. ▪️ M व N  श्रेणीतील (किमान चार चाके असणारी) वाहनांमध्ये ‘सीट बेल्ट अलार्म’ अनिवार्य असेल. ओव्हर स्पीडसाठी अलार्म बंधनकारक असेल. तसेच सेंट्रल लॉकसाठी मॅन्युअल ओव्हर राइड.असेल  ▪️ M1 श्रेणीच्या वाहनांमध्ये ‘चाइल्ड लॉक’ला परवानगी दिली जाणार नाही. ▪️ समोरच्या सर्व आसनांसाठी बेल्ट अनिवार्य असेल. ▪️ अलार्म तीन स्तरांवर वाजतील. ▪️ कारचे इंजिन सुरु झाल्यावर व...

🎯 आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतले महत्वाचे निर्णय - प्रत्येकाने वाचा Breaking Update

  🎯 आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतले महत्वाचे निर्णय - प्रत्येकाने वाचा   Breaking Update 🧐 आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये लिपिकपदाची भरती आता एमपीएससीमार्फत घेण्याचा निर्णय झाला आहे.  ✒️ तसेच धारावी पुनर्विकासाठी नव्याने निविदा व पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक यांच्या रजा 12 पासून 20 पर्यंत वाढवण्याचा निणय घेण्यात आला आहे.   💁‍♂️ पहा इतर काही महत्वाचे निर्णय ● भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. (उच्च व तंत्रशिक्षण) ● पु.ल. देशपांडे अकादमीमध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाचे कामकाज 28 सप्टेंबरपासून प्रारंभ. (उच्च व तंत्रशिक्षण) ● राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करणार. त्यामुळे शासनाची जमीन, भागभांडवल, कर्ज, कर्ज हमी याबाबतीतल्या सार्वजनिक हिताचे रक्षण (वित्त विभाग ) ● पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा 12 पासून 20 इतक्या वाढवल्या. (गृह विभाग ) ● सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण...

😱 1 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या नियमामध्ये होणार मोठे बदल - प्रत्येकाने वाचा Breaking Update

😱  1 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या नियमामध्ये होणार मोठे बदल - प्रत्येकाने वाचा   Breaking Update 🧐  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं क्रिकेटच्या नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत - तसेच हे बदल 1 ऑक्टोबरपासून लागू होतील - असेही ICC म्हटले आहे    कसे आहेत नवे नियम ? ▪️ आयसीसी’च्या नवीन नियमांनुसार, एखादा बॅट्समन झेलबाद झाल्यावर नवीन फलंदाजच स्ट्राईकवर राहिल. याआधी एखादा फलंदाज झेलबाद झाला,  ▪️ तर नॉन स्ट्रायकर फलंदाजाने क्रीज ओलांडली असेल, तर त्याला फलंदाजीची संधी मिळायची. मात्र, आता क्रीज ओलांडली, तरी नवीन बॅट्समनच स्ट्राईकवर असेल ▪️ कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून चेंडूवर थुंकी लावण्यास ‘आयसीसी’ने बंदी घातली आहे. आता हा नियम कायमस्वरुपी असेल. यापुढे कोणत्याही गोलंदाजास चेंडूला थुंकी लावता येणार नाही.  ▪️ कसोटी किंवा एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन मिनिटांत फलंदाजी करण्यासाठी नवीन बॅट्समनला तयार व्हावं लागेल. टी-20 फॉरमॅटमध्ये ही वेळ फक्त 90 सेकंद असेल. याआधी कसोटी व वन-डे सामन्यांमध्ये ही वेळ 3 मिनिटांची होती.  ▪️ मैदानात क्षेत्ररक्षण करताना खेळाडूने ज...

पेट्रोल आणि डिझेल वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यासाठी नवे नियम लागू - प्रत्येकाने वाचा Important Updates

🔖 पेट्रोल आणि डिझेल वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यासाठी नवे नियम लागू - प्रत्येकाने वाचा  Important Updates 🧐 तसे तुम्हाला माहितीअसेल , याआधीच्या मॅसेज मध्ये आपण दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर केले जाईल याविषयी माहिती घेतली  📝 दरम्यान या मॅसेज मध्ये आपण या वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यासाठी कुठले नियम असतील याविषयी जाणून घेऊ  🤷‍♂️  पहा कसे असतील नवे नियम  ● जुन्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांमध्ये इलेक्ट्रिक किट बसवण्याचे काम केवळ सरकारने मान्यता केलेल्या केंद्रांवर केले जाईल ● इंस्टॉलरला उत्पादक किंवा पुरवठादाराकडून इलेक्ट्रिक किट खरेदी करावी लागेल - इंस्टॉलरची जबाबदारी फक्त कारमध्ये किट बसवण्यापुरतीच मर्यादित असेल ● तसेच वाहनात इलेक्ट्रिक किट बसवता येईल की नाही हे ठरवणेही इंस्टॉलरचे काम असेल - ज्या वाहनांमध्ये हे किट बसवले जाईल, त्यांची वर्षातून एकदा फिटनेस चाचणी करणे आवश्यक आहे 😇  वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर  - करण्यासाठी लागू केलेले हे नियम वाहन धारकांसाठी ,खूप महत्वाचे आहे  - आपण इतरांना देखी...

डेबिट-क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये होणार मोठे बदल - १ ऑक्टोबरपासून लागू होतील नवे नियम Govt. Update

😱  डेबिट-क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये होणार मोठे बदल - १ ऑक्टोबरपासून लागू होतील नवे नियम    Govt. Update 🧐 क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डच्या व्यवहार करण्याच्या नियमात १ ऑक्टोबर पासून महत्वाचे बदल करण्यात येणार आहेत - तसा हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू केला जाणार होता.   ✒️ पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा नियम लागू करण्याची मुदत पुढे ढकलून 30 जून 2022 केली होती. मात्र आता आरबीआयने आपली शेवटची मुदत 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवली आहे  💁‍♂️  पहा कसे आहेत नियम ? ▪️ आरबीआय आता क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ‘कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन’ नावाचा एक नियम आणणार आहे. ▪️ त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवहारासाठी तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा व्यवहार करण्यासाठी 16-अंकी कार्ड क्रमांक, कार्डची मुदत, सीव्हीव्ही आणि ओटीपी टाकावा लागतो.  ▪️ तसेच सर्व माहिती अचूक भरल्यानंतरच व्यवहार यशस्वी होतो. मात्र यामध्ये टोकनायझेशन नसल्याने फसवणूक जास्त प्रमाणात होत होती  ▪️ मात्र आता जेव्हा तुमच्याकडून तुमच्या डेबिट/क्रेडिट का...

अटल पेन्शन योजनेत मोठा बदल - 1 ऑक्टोबरपासून लागू होतील नवे नियम Govt. Update

😱 अटल पेन्शन योजनेत मोठा बदल - 1 ऑक्टोबरपासून लागू होतील नवे नियम  Govt. Update 📝 असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पेन्शन मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या अटल पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये सरकारने मोठा बदल केला आहे.  ⏲️ त्यानुसार जी व्यक्ती आयकर भरत असेल अश्या व्यक्ती 1 ऑक्टोबर 2022 नंतर या योजनेत गुंतवणूक करू शकणार नाही, यासंदर्भातील अधिसूचना 10 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली आहे. 🤷‍♂️  कशी आहे अधिसूचना  ? ▪️ तुम्हाला माहिती असेल , अटल पेन्शन योजना आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना विशेषत: अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे, जे इतर कोणत्याही सरकारी पेन्शनचा लाभ घेऊ शकत नाहीत. ▪️ वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वित्तीय सेवा विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे. जे आयकर भरतात, ते अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत.  ▪️ तसेच अर्थ मंत्रालयाचा नवीन नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे. मात्र 1 ऑक्टोबर रोजी किंवा त्यानंतर, या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या आयकरदात्याचे खाते बंद केले जाईल आणि खात्यात जमा केलेले पेन्शनचे ...

🌧️ राज्यात पुन्हा पावसाचा इशारा - पहा कुठं पडणार पाऊस Wheather Update

🌧️  राज्यात पुन्हा पावसाचा इशारा - पहा कुठं पडणार पाऊस  Wheather Update 🧐 राज्यात चालू आठवड्यात मान्सून सक्रिय असल्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. मुंबई हवामान केंद्राने राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे 🤷‍♂️  पहा कुठं पडणार पाऊस ? ● *१९ सप्टेंबरला*  – जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वाशीम या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलाा आहे. ● २० सप्टेंबरला   – जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला तर  ●   २१ सप्टेंबरला   –  जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि ...