Skip to main content

Posts

Showing posts from September, 2022

😱 शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी ! - पीएम किसान योजनेत मोठा बदल Farmer Update

😱  शेतकऱ्यांसाठी धक्कादायक बातमी ! - पीएम किसान योजनेत मोठा बदल  Farmer Update 🧐 केंद्र सरकारने पीएम किसान सन्मान निधी योजनेत मोठा बदल केला आहे -  🤷‍♂️  काय बदल झाला ? - यापूर्वी शेतकऱ्यांना त्याचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्डच्या मदतीने लाभार्थी स्थिती पाहता येत होती  ✒️ मात्र आता सरकारने ही पद्धत बदलली त्यामुळे शेतकऱ्यांना पीएम किसान पोर्टलवर जाऊन आधार क्रमांक टाकून लाभार्थी स्टेटस पाहता येणार नाही तर आता शेतकऱ्यांना स्टेटस पाहण्यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांक टाकणे आवश्यक असणार आहे. 👉 असे पाहता येईल स्टेटस - pmkisan.gov.in वेबसाईटवर जा. डावीकडील लहान बॉक्समध्ये Beneficiary Status (लाभार्थी स्टेटस) वर क्लिक करा. ▪️ त्यांनतर नोंदणी क्रमांक टाकून तुमचे स्टेटस चेक करा. जर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहीत नसल्यास, Know Your Registration Number यावर क्लिक करा. ▪️ नंतर पीएम किसान खात्यावर तुमचा नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका. यानंतर, कॅप्चा कोड भरा आणि Get Mobile OTP वर क्लिक करा. ▪️ यासोबतच बॉक्समध्ये तुमच्या नंबरवर मिळालेला OTP टाका आणि Get Detail...

👌 आता ३१ डिसेंबर पर्यंत मिळणार पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ - रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर Govt. Update

👌 आता ३१ डिसेंबर पर्यंत मिळणार पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ - रेशन कार्डधारकांसाठी खुशखबर Govt. Update 💫 तुम्हाला माहिती असेल, पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेला यायाधी ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती - मात्र आता मोदी सरकारने या योजनेला पुन्हा एकदा 3 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.  ⏲️ त्यामुळे गोरगरीब जनतेला आता डिसेंबर-2022 पर्यंत मोफत अन्नधान्य मिळणार आहे - असे काल झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले 📍  पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेचा - लाभ आता डिसेंबर-2022 पर्यंत मिळणार, हि बातमी आपण इतरांना देखील शेअर करा

⛽ सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी ! - आता वर्षभरात मिळणार फक्त 15 सिलिंडर Breaking Update

⛽  सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी ! - आता वर्षभरात मिळणार फक्त 15 सिलिंडर Breaking Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, यापूर्वी विनाअनुदानित घरगुती गॅस कनेक्शन असणाऱ्या ग्राहकांना केव्हाही आणि वर्षभर लागलीत तेवढे सिलिंडर घेता येत होते. मात्र आता घरगुती एलपीजी सिलिंडरसाठी नवे नियम लागू करण्यात आले आहेत.  ✒️ नव्या नियमानुसार, ग्राहकाला वर्षभरात केवळ 15 सिलिंडरच मिळतील - तसेच एक महिन्याचा कोटाही निश्चित करण्यात आला असून ग्राहकांना महिन्यात दोन पेक्षा जास्त सिलिंडर घेता येणार नाहीत - असेहि केंद्र सरकारने म्हटले आहे  🤷‍♂️  आणखी काय सांगितले केंद्र सरकारने ?  💫 अनुदानित घरगुती गॅस सिलिंडरची नोंदणी असणाऱ्या ग्राहकांना वर्षभरात १२ सिलिंडर मिळतील. तर यापेक्षा जास्त सिलिंडरची आवश्यकता असेल तर ग्राहकांना विनाअनुदानित सिलिंडर घ्यावे लागणार आहेत. 📝 रेशनिंग अंतर्गत एक ग्राहक महिन्यात फक्त दोन घरगुती गॅस सिलिंडर घेऊ शकतो. एखाद्या ग्राहकाला जास्त सिलिंडर लागत असल्यास त्याचा पुरावा देऊन तेल कंपनीच्या अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्यानंतरच अतिरिक्त रिफिल मिळेल. 🙏  आता वर्षभरात फक्त...

👌 ‘पासपोर्ट’ बनवण्याच्या नियमामध्ये होणार मोठा बदल - प्रत्येकाने वाचा Informative Update

👌  ‘पासपोर्ट’ बनवण्याच्या नियमामध्ये होणार मोठा बदल - प्रत्येकाने वाचा Informative Update ✒️ तुम्हाला माहिती असेल, पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट’ असल्याशिवाय ‘पासपोर्ट’ दिला जात नाही. पासपोर्ट काढताना ‘पीसीसी’ ही एक महत्वाची प्रक्रिया आहे.  📍 निवासी स्थिती, रोजगार किंवा दीर्घकालीन व्हिसा, इमिग्रेशनसाठी अर्ज करताना ‘पोलिस व्हेरिफिकेशन’ आवश्यक असत - मात्र आता परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट बनवण्याच्या नियमामध्ये मोठा बदल केला आहे  🤔  पहा काय सांगितले परराष्ट्र मंत्रालयाने ?  ▪️ पासपोर्टसाठी अनिवार्य असलेल्या ‘पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट’साठी अर्जदारांना आता ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांमध्ये अर्ज करता येणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलं आहे.  ▪️ यासाठी मंत्रालयाने भारतातील सर्व ऑनलाइन पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांना ‘पीसीसी’ साठी अर्ज करण्याच्या सुविधेसह जोडण्याचा निर्णय घेतला आहे. ▪️ त्यामुळे पासपोर्ट अर्जदार आता ‘पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेट’ साठी पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रावर ऑनलाइन अर्ज करू शकतात.  👉  आपण थोडस सहकार...

🎯 आता वन कर्मचाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार लाभ - राज्य सरकारचा मोठा निर्णय Breaking Update

  🎯 आता वन कर्मचाऱ्यांना पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणे मिळणार लाभ - राज्य सरकारचा मोठा निर्णय Breaking Update 🧐 वन कर्मचाऱ्यांना आता पोलीस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या प्रस्तावाला मान्यता देण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. 🤷‍♂️ पहा काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार ? ● वन विभागाच्या प्रस्तावानुसार, वनांचे व वन्य प्राण्यांचे संरक्षण करताना दुर्दैवाने वन कर्मचारी मृत्युमुखी पडल्यास अशा मृत वन कर्मचाऱ्याच्या वारसास रु. 25 लाख सानुग्रह अनुदान देण्यात येईल.  ● तसेच कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या वारसास अनुकंपा तत्वावर प्राधान्याने नोकरी देण्यात येईल. जर वारस नोकरी करण्यास सक्षम नसेल किंवा वारसाने नोकरी नाकारली - ● तर सदर मृत वन कर्मचाऱ्याच्या नियत सेवानिवृत्तीच्या दिनांकापर्यंतचे वेतन सदर कुटुंबाला देण्यात येईल. याचबरोबर कर्तव्य बजावताना मृत्यू पावलेल्या वन कर्मचाऱ्यांच्या पार्थिवाचे कुटुंबाने ठरवलेल्या ठिकाणपर्यंतचे रस्ते/रेल्वे/विमान इत्यादी मार्गे वहन करण्याचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल. ● याव्यतिरिक...

🔖 उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! - राज्यात लवकरच 20 हजार जागांसाठी होणार पोलीस भरती Breaking Update

🔖 उपमुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा ! - राज्यात लवकरच 20 हजार जागांसाठी होणार पोलीस भरती Breaking Update 🖊️ राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस भरतीबाबत मोठी घोषणा केली आहे - राज्यातील पोलिस दलात पुढील 2 वर्षात 20 हजार जागांसाठी भरती करण्यात येणार आहे.  🗣️ यापूर्वी पोलिस दलात सात ते आठ हजार जागांची भरती करण्याबाबत जाहीरात काढली होती. त्यात आता आणखी 12 हजार जागांची भर पडणार असून, लवकरच या भरतीची जाहीरात काढली जाईल - असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले  🤷‍♂️  काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?  🕹️ ‘राज्यात अनेक सायबर गुन्हे घडत आहेत. फिशिंगच्या माध्यमातून लोकांना लुटले जात आहे, त्यांना त्रास दिला जातोय. यासाठी सरकार योग्य ती कारवाई करीत असून,  🕵️‍♀️ राज्यात लवकरच सायबर सिक्युरीटीचे रोबस्ट इन्फ्रास्ट्रक्चर उभारणार आहोत - त्यासाठी राज्यात लवकरच पोलीस दलात 20 हजार जागांसाठी भरती होणार आहे  📌  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  - यांनी केलेली हि घोषणा सर्व स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा

आता घरबसल्या पाहता येणार हवामान अपडेट - पहा सविस्तर Informative Update

🌍  आता घरबसल्या पाहता येणार हवामान अपडेट - पहा सविस्तर   Informative Update 🧐 देशात बदलत्या हवामानानुसार कुठे पाऊस तर कुठे ऊन अशी परिस्थिती यंदा काही दिवसांपूर्वी दिसली. दोन ते तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर नवरात्रीत अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण -  ✒️ तर काही ठिकाणी पावसाने जोर धरला आहे - यामुळे जर आपल्याला हवामानाची स्थिती जाणून घ्यायची असेल, तर काही मोबाईल ॲप्स आपल्याला मदत करतील चला तर जाणून घेऊ. 🔰  १. Weather - Live & forecast  - हे अ‍ॅप प्ले स्टोअरवर फ्रीमध्ये उपलब्ध आहे. या अँप मध्ये तुम्हाला रोजचे तापमान, अंदाजात्मक हवामान बदल माहिती मिळते   🔰  २. Weather & Radar India  - हे अ‍ॅप देखील स्टोअरवर फ्रीमध्ये उपलब्ध आहे - यामध्ये हवामान थेट रडार नकाशे, मान्सून पावसाचा अंदाज, फार्म वेदर, 7 ते 14 दिवसांचा लोकल वेदर फोरकास्ट यांसारखी वैशिष्ट्ये दिली आहेत. 🔰  ३. Weather Apps - Weather Live  - हे अ‍ॅप तुम्हाला सध्याच्या ताज्या वेळेचा हवामान अंदाज देते. तसेच यामध्ये लोकल व नॅशनल असे दोन पर्याय दिलेले आहेत. इथून प्रत...

सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी - 1 ऑक्टोंबरपासून बदलणार ‘हे’ नियम Breaking Update

😱  सर्वसामान्यांसाठी मोठी बातमी - 1 ऑक्टोंबरपासून बदलणार ‘हे’ नियम  Breaking Update 🧐 येत्या 1 ऑक्टोंबरपासून बँकेशी संबंधित व इतर अनेक नियमात बदल होणार आहे. या बदलाचा सर्वसामान्य नागरीकांच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे. हे जाणून घेणे खूप महत्वाचे आहे  💳   १. डेबिट-क्रेडिट कार्डच्या  - नियमामध्ये बदल होणार आहे, यामध्ये जेव्हा आपण कार्डने व्यवहार करतो, तेव्हा त्याचे तपशील कंपनीच्या सर्व्हरमध्ये सेव्ह व्हायचे. म्हणजे आपण एकदा कार्डची माहिती सेव्ह केल्यांनतर फक्त सीव्हीव्ही टाकून पेमेंट करता येत होते  ▪️ मात्र आता यामध्ये बदल होणार आहे -  त्यामुळे ग्राहकांना पेमेंट कंपन्यांना आता कार्डच्या बदल्यात एक पर्यायी कोड द्यावा लागेल, ज्याचे नाव टोकन आहे. हे टोकन युनिक असतील आणि तेच टोकन एकाहून अधिक कार्डांसाठी काम करेल. ▪️ याची अंमलबजावणी झाल्यानंतर, ऑनलाइन पेमेंटसाठी, थेट कार्ड वापरण्याऐवजी, एक अद्वितीय टोकन वापरावे लागेल. 💰  २. अटल पेन्शन योजनेमध्ये  - बदल होणार, नवीन नियमांनुसार आता आयकर भरणारे लोक या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत.  📈 ...

RBI ची मोठी घोषणा ! - 500 रुपयांच्या नोटेत होणार मोठा बदल Banking Update

😱  RBI ची मोठी घोषणा ! - 500 रुपयांच्या नोटेत होणार मोठा बदल  Banking Update ✒️ रिजर्व बॅंक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, 500 रुपयांच्या नोटांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 500 रुपयांच्या नोटा साठवून ठेवणाऱ्यांनी नोटांमध्ये कोणता बदल होईल हे जाणून घेणं गरजेचे आहे. 💁‍♂️  पहा काय बदल होणार ?  ● देशभरात चलनात येणाऱ्या नोटांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने मोठा खुलासा केला आहे. देशातील दृष्टिहीन लोकांसाठी रुपया आणि नाणी अधिक अनुकूल बनवण्याचे मार्ग सुचवण्यास न्यायालयाने तज्ञांना सांगितले आहे.  ● यामध्ये 500 रुपयांच्या नोटांचाही समावेश आहे - या बदलामुळे दृष्टिहीन लोकांना नोट सहज ओळखता येईल. 👉  MANI App  - तुम्हाला माहिती असेल, RBI ने नोटा ओळखण्यासाठी MANI App तयार केले आहे - अंध लोकांना नोटा ओळखण्यात येणाऱ्या अडचणी दूर करणे हा त्यामागचा उद्देश होता. ● यापूर्वी या अँपमध्ये फक्त हिंदी आणि इंग्रजी भाषा उपलब्ध होती. मात्र आता हे App उर्दू, आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, उडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये उपलब्ध असेल.  ●...

🧐 रेशन कार्ड-धारकांसाठी महत्वाचा निर्णय - मोफत अन्न योजनेत होणार मोठा बदल Govt. Update

🧐  रेशन कार्ड-धारकांसाठी महत्वाचा निर्णय - मोफत अन्न योजनेत होणार मोठा बदल  Govt. Update 🙂 तुम्हाला माहिती असेल, कोरोना काळात केंद्र सरकारने ‘पंतप्रधान गरीब कल्याण अन्नयोजना’ सुरु केली होती. मात्र सरकारी तिजोरीवर मोठा ताण येत असल्याने मध्यंतरी ही योजना बंद केली जाणार असल्याची चर्चा झाली होती.  🖊️ पण आतापर्यंत सातत्याने या योजनेला मुदतवाढ देण्यात आली. सध्या फ्री रेशन योजनेची मुदत 30 सप्टेंबरपर्यंत आहे. या योजनेला आणखी 3 ते 6 महिने मुदतवाढ दिली जाणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे  🗣️ दरम्यान हि योजना सुरु असताना या योजनेत मोठा बदल करण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे सांगितले जात आहे  💁‍♂️  पहा काय बदल होणार ?  📙 आगामी काळात मोफत अन्न-धान्याऐवजी लाभार्थींच्या खात्यावर थेट ‘डीबीटी’ च्या माध्यमातून पैसे जमा करण्याचा मोदी सरकारचा विचार आहे. अर्थात, ‘रेशन की पैसे’ याची निवड करण्याची मुभा लाभार्थांना असणार आहे. 👩‍💻 सध्या या प्रस्तावावर चर्चा सुरू असून, पुढील आर्थिक वर्षात हे बदल होऊ शकतात - दरम्यान याविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या...

आता WhatsApp कॉल कारणासाठी द्यावे लागतील अतिरिक्त पैसे - जाणून घ्या सविस्तर. Important Update

🪀  आता WhatsApp कॉल कारणासाठी द्यावे लागतील अतिरिक्त पैसे - जाणून घ्या सविस्तर Important Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, आतापर्यंत WhatsApp कॉल कारणासाठी कुठल्याही प्रकारचे चार्जेस द्यावे लागत नव्हते  😱 मात्र यापुढे व्हॉट्सएप कॉल करण्यासाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील - यासाठी केंद्र सरकारने दूरसंचार विधेयकाचा मसुदा प्रसिद्ध केला आहे  🤷‍♂️  पहा कसे आहे विधायक  ▪️ व्हॉट्सअॅप, फेसबुकच्या माध्यमातून कॉल किंवा मेसेज पाठवण्याची सुविधा दूरसंचार सेवा मानली जाईल, अशी तरतूद या विधेयकात आहे. त्यासाठी या कंपन्यांना परवाना घ्यावा लागणार आहे ▪️ देशातील दूरसंचार कंपन्या व्हॉट्सअॅप ,फेसबुक सारख्या प्लॅटफॉर्मवर ग्राहकांना मेसेजिंग किंवा कॉलिंग सेवा पुरवली जात आहे, जी दूरसंचार सेवेअंतर्गत येत असल्याचे सांगत आहेत.  ▪️ तसेच 20 ऑक्टोबरपर्यंत या विधेयकातील तरतुदींबाबत लोक आपली मते मांडून हे विधेयक संसदेत मांडले जाईल - त्यानंतर योग्य निर्णय घेण्यात येईल , असे दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले  📍 दरम्यान चार्जेस किती व कसे लागतील याविषयी काही अपडेट आले तर आम्ही तुमच...

🔖 ड्रायव्हिंग लायसन्स बाबत नव्या गाईडलाईन्स जारी - प्रत्येकाने वाचा

🔖 ड्रायव्हिंग लायसन्स बाबत नव्या गाईडलाईन्स जारी - प्रत्येकाने वाचा  Govt. Update 🧐 केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मान्यताप्राप्त ‘ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स’ आणि ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ बाबत नव्याने गाईडलाईन्स जारी केल्या आहेत 🤷‍♂️ कशा आहेत गाईडलाईन्स ? ✍️ रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या निवेदनानुसार, ‘मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्स’ची मान्यता आता केवळ 5 वर्षांसाठी असणार आहे.  🗣️ त्यानंतर ट्रेनिंग सेंटरला आपली मान्यता पुन्हा एकदा ‘रिन्यू’ करावी लागणार - असे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने म्हटले आहे  👉 २. गाईडलाईन्स - आता कोणत्याही नागरिकाच्या नावे ‘ड्रायव्हिंग लायसन्स’ जारी करण्यापूर्वी प्रशिक्षणार्थीला ‘ड्रायव्हिंग टेस्ट’मध्ये उत्तीर्ण व्हावंच लागणार आहे.  🚗 तसेच ड्रायव्हिंग ट्रेनिंग सेंटर्सना लोकांना सहज सेवा मिळावी, यासाठी ‘ट्रेनिंग सेंटर्स’शी संबंधित सेवा शुल्काची माहिती द्यावी लागेल - असेही स्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. 🙏 दरम्म्यान ड्रायव्हिंग लायसन्स बाबत - जारी केलेले हे नवे न...

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - शेतजमीनच्या खरेदी-विक्रीच्या नियमात होणार मोठे बदल Farmer Update

📣   शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - शेतजमीनच्या खरेदी-विक्रीच्या नियमात होणार मोठे बदल  Farmer Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, राज्यातील शेतकऱ्यांना ‘तुकडेबंदी-तुकडेजोड कायदा 1947’ नुसार, जिरायती जमीन ही 2 एकरांपेक्षा कमी असल्यास, तर बागायती जमीन ही 20 गुंठ्यांपेक्षा कमी असली, तरी विकता येत नव्हती 🚫 विशेष म्हणजे, 2 एकरांच्या गटातील 5 ते 6 गुंठे जमीनही विकता येत नव्हती. त्यामुळे  भांडण-तंटे वाढले होते. मात्र आता ही बाब लक्षात आल्यानंतर राज्य सरकारने शेतजमीन खरेदी-विक्रीच्या नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे ✒️ दरम्यान या निर्णयाची अमलबजावणी ऑक्टोबर महिन्यात होण्याची शक्यता आहे -  💁‍♂️  पहा कसे आहेत नियम 👉 नव्या प्रस्तावानुसार, आता ‘तुकडेबंदी-तुकडेजोड कायदा 1947’ मध्ये बदल केला जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना 2 एकर जिरायती शेतीऐवजी 20 गुंठे, तर बागायती जमिनीसाठी 20 गुंठ्याऐवजी 5 गुंठ्यांची मर्यादा ठरवून दिली जाणार आहे.  🗣️ त्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांना जमिनीचे व्यवहार करणं सोप्पं होणार - असे राज्य शासनाने म्हटले आहे  😇  शेतजमीनच्या खरे...

गाडीतील ‘सीट बेल्ट’ बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय - प्रत्येकाने वाचा Govt. Update

🧐  गाडीतील ‘सीट बेल्ट’ बाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय - प्रत्येकाने वाचा  Govt. Update ✍️ कारमध्ये मागच्या सीटवर बसणाऱ्या नागरिकांनाही आता ‘सीट बेल्ट’चा वापर बंधनकारक करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.  📙 या नवीन नियमावर 5 ऑक्टोबरपर्यंत सर्वसामान्य नागरिकांची मतं मागवली जाणार आहेत. तसेच नागरिकांच्या सूचनांनुसार, नवे नियम लागू केले जाणार असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे 🤷‍♂️  पहा कसे आहेत नियम ▪️ केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने, वाहन निर्मात्या कंपन्यांना वाहनांच्या मागच्या ‘सीट बेल्ट’साठी ही ‘अलार्म’ लावण्यास सांगितलं आहे. मंत्रालयाकडून त्यासाठीचे ‘ड्राफ्ट नोटिफिकेशन’ जारी करण्यात आलं आहे. ▪️ M व N  श्रेणीतील (किमान चार चाके असणारी) वाहनांमध्ये ‘सीट बेल्ट अलार्म’ अनिवार्य असेल. ओव्हर स्पीडसाठी अलार्म बंधनकारक असेल. तसेच सेंट्रल लॉकसाठी मॅन्युअल ओव्हर राइड.असेल  ▪️ M1 श्रेणीच्या वाहनांमध्ये ‘चाइल्ड लॉक’ला परवानगी दिली जाणार नाही. ▪️ समोरच्या सर्व आसनांसाठी बेल्ट अनिवार्य असेल. ▪️ अलार्म तीन स्तरांवर वाजतील. ▪️ कारचे इंजिन सुरु झाल्यावर व...

🎯 आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतले महत्वाचे निर्णय - प्रत्येकाने वाचा Breaking Update

  🎯 आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतले महत्वाचे निर्णय - प्रत्येकाने वाचा   Breaking Update 🧐 आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत 12 मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये लिपिकपदाची भरती आता एमपीएससीमार्फत घेण्याचा निर्णय झाला आहे.  ✒️ तसेच धारावी पुनर्विकासाठी नव्याने निविदा व पोलिस शिपाई ते पोलिस निरीक्षक यांच्या रजा 12 पासून 20 पर्यंत वाढवण्याचा निणय घेण्यात आला आहे.   💁‍♂️ पहा इतर काही महत्वाचे निर्णय ● भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयात प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहे. (उच्च व तंत्रशिक्षण) ● पु.ल. देशपांडे अकादमीमध्ये तात्पुरत्या काळासाठी महाविद्यालयाचे कामकाज 28 सप्टेंबरपासून प्रारंभ. (उच्च व तंत्रशिक्षण) ● राज्य मालमत्ता पुनर्रचना कंपनी स्थापन करणार. त्यामुळे शासनाची जमीन, भागभांडवल, कर्ज, कर्ज हमी याबाबतीतल्या सार्वजनिक हिताचे रक्षण (वित्त विभाग ) ● पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा 12 पासून 20 इतक्या वाढवल्या. (गृह विभाग ) ● सफाई कामगारांच्या वारसा हक्काच्या अंमलबजावणीत सुधारणा करण...

😱 1 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या नियमामध्ये होणार मोठे बदल - प्रत्येकाने वाचा Breaking Update

😱  1 ऑक्टोबरपासून क्रिकेटच्या नियमामध्ये होणार मोठे बदल - प्रत्येकाने वाचा   Breaking Update 🧐  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं क्रिकेटच्या नियमांमध्ये अनेक बदल केले आहेत - तसेच हे बदल 1 ऑक्टोबरपासून लागू होतील - असेही ICC म्हटले आहे    कसे आहेत नवे नियम ? ▪️ आयसीसी’च्या नवीन नियमांनुसार, एखादा बॅट्समन झेलबाद झाल्यावर नवीन फलंदाजच स्ट्राईकवर राहिल. याआधी एखादा फलंदाज झेलबाद झाला,  ▪️ तर नॉन स्ट्रायकर फलंदाजाने क्रीज ओलांडली असेल, तर त्याला फलंदाजीची संधी मिळायची. मात्र, आता क्रीज ओलांडली, तरी नवीन बॅट्समनच स्ट्राईकवर असेल ▪️ कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून चेंडूवर थुंकी लावण्यास ‘आयसीसी’ने बंदी घातली आहे. आता हा नियम कायमस्वरुपी असेल. यापुढे कोणत्याही गोलंदाजास चेंडूला थुंकी लावता येणार नाही.  ▪️ कसोटी किंवा एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन मिनिटांत फलंदाजी करण्यासाठी नवीन बॅट्समनला तयार व्हावं लागेल. टी-20 फॉरमॅटमध्ये ही वेळ फक्त 90 सेकंद असेल. याआधी कसोटी व वन-डे सामन्यांमध्ये ही वेळ 3 मिनिटांची होती.  ▪️ मैदानात क्षेत्ररक्षण करताना खेळाडूने ज...

पेट्रोल आणि डिझेल वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यासाठी नवे नियम लागू - प्रत्येकाने वाचा Important Updates

🔖 पेट्रोल आणि डिझेल वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यासाठी नवे नियम लागू - प्रत्येकाने वाचा  Important Updates 🧐 तसे तुम्हाला माहितीअसेल , याआधीच्या मॅसेज मध्ये आपण दिल्लीत पेट्रोल आणि डिझेल वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर केले जाईल याविषयी माहिती घेतली  📝 दरम्यान या मॅसेज मध्ये आपण या वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर करण्यासाठी कुठले नियम असतील याविषयी जाणून घेऊ  🤷‍♂️  पहा कसे असतील नवे नियम  ● जुन्या पेट्रोल आणि डिझेल वाहनांमध्ये इलेक्ट्रिक किट बसवण्याचे काम केवळ सरकारने मान्यता केलेल्या केंद्रांवर केले जाईल ● इंस्टॉलरला उत्पादक किंवा पुरवठादाराकडून इलेक्ट्रिक किट खरेदी करावी लागेल - इंस्टॉलरची जबाबदारी फक्त कारमध्ये किट बसवण्यापुरतीच मर्यादित असेल ● तसेच वाहनात इलेक्ट्रिक किट बसवता येईल की नाही हे ठरवणेही इंस्टॉलरचे काम असेल - ज्या वाहनांमध्ये हे किट बसवले जाईल, त्यांची वर्षातून एकदा फिटनेस चाचणी करणे आवश्यक आहे 😇  वाहनांचे इलेक्ट्रिकमध्ये रूपांतर  - करण्यासाठी लागू केलेले हे नियम वाहन धारकांसाठी ,खूप महत्वाचे आहे  - आपण इतरांना देखी...

डेबिट-क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये होणार मोठे बदल - १ ऑक्टोबरपासून लागू होतील नवे नियम Govt. Update

😱  डेबिट-क्रेडिट कार्डच्या नियमामध्ये होणार मोठे बदल - १ ऑक्टोबरपासून लागू होतील नवे नियम    Govt. Update 🧐 क्रेडिट कार्ड व डेबिट कार्डच्या व्यवहार करण्याच्या नियमात १ ऑक्टोबर पासून महत्वाचे बदल करण्यात येणार आहेत - तसा हा नियम 1 जानेवारी 2022 पासून लागू केला जाणार होता.   ✒️ पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने हा नियम लागू करण्याची मुदत पुढे ढकलून 30 जून 2022 केली होती. मात्र आता आरबीआयने आपली शेवटची मुदत 1 ऑक्टोबर 2022 पर्यंत वाढवली आहे  💁‍♂️  पहा कसे आहेत नियम ? ▪️ आरबीआय आता क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी ‘कार्ड-ऑन-फाइल टोकनायझेशन’ नावाचा एक नियम आणणार आहे. ▪️ त्यामुळे जेव्हा तुम्ही एखाद्या व्यवहारासाठी तुमचे डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता तेव्हा व्यवहार करण्यासाठी 16-अंकी कार्ड क्रमांक, कार्डची मुदत, सीव्हीव्ही आणि ओटीपी टाकावा लागतो.  ▪️ तसेच सर्व माहिती अचूक भरल्यानंतरच व्यवहार यशस्वी होतो. मात्र यामध्ये टोकनायझेशन नसल्याने फसवणूक जास्त प्रमाणात होत होती  ▪️ मात्र आता जेव्हा तुमच्याकडून तुमच्या डेबिट/क्रेडिट का...

अटल पेन्शन योजनेत मोठा बदल - 1 ऑक्टोबरपासून लागू होतील नवे नियम Govt. Update

😱 अटल पेन्शन योजनेत मोठा बदल - 1 ऑक्टोबरपासून लागू होतील नवे नियम  Govt. Update 📝 असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पेन्शन मिळावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या अटल पेन्शन योजनेच्या नियमांमध्ये सरकारने मोठा बदल केला आहे.  ⏲️ त्यानुसार जी व्यक्ती आयकर भरत असेल अश्या व्यक्ती 1 ऑक्टोबर 2022 नंतर या योजनेत गुंतवणूक करू शकणार नाही, यासंदर्भातील अधिसूचना 10 ऑगस्ट रोजी जारी करण्यात आली आहे. 🤷‍♂️  कशी आहे अधिसूचना  ? ▪️ तुम्हाला माहिती असेल , अटल पेन्शन योजना आर्थिक वर्ष 2015-16 मध्ये सुरू करण्यात आली. ही योजना विशेषत: अशा लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे, जे इतर कोणत्याही सरकारी पेन्शनचा लाभ घेऊ शकत नाहीत. ▪️ वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या वित्तीय सेवा विभागाने जारी केलेल्या अधिसूचनेत असे म्हटले आहे. जे आयकर भरतात, ते अटल पेन्शन योजनेसाठी अर्ज करू शकणार नाहीत.  ▪️ तसेच अर्थ मंत्रालयाचा नवीन नियम 1 ऑक्टोबर 2022 पासून लागू होणार आहे. मात्र 1 ऑक्टोबर रोजी किंवा त्यानंतर, या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या आयकरदात्याचे खाते बंद केले जाईल आणि खात्यात जमा केलेले पेन्शनचे ...

🌧️ राज्यात पुन्हा पावसाचा इशारा - पहा कुठं पडणार पाऊस Wheather Update

🌧️  राज्यात पुन्हा पावसाचा इशारा - पहा कुठं पडणार पाऊस  Wheather Update 🧐 राज्यात चालू आठवड्यात मान्सून सक्रिय असल्यामुळे विविध जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. मुंबई हवामान केंद्राने राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे 🤷‍♂️  पहा कुठं पडणार पाऊस ? ● *१९ सप्टेंबरला*  – जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वाशीम या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिलाा आहे. ● २० सप्टेंबरला   – जळगाव, अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला तर  ●   २१ सप्टेंबरला   –  जळगाव, अहमदनगर, पुणे, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशीम आणि ...

मोठी बातमी ! - आता पोस्ट ऑफिसद्वारे करता येणार ऑनलाईन शॉपिंग - प्रत्येकाने वाचा. Breaking Update

📦 मोठी बातमी ! - आता पोस्ट ऑफिसद्वारे करता येणार ऑनलाईन शॉपिंग - प्रत्येकाने वाचा Breaking Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, भारतात सध्या अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबसाइट्सवरुन सर्वाधिक खरेदी केली जाते. ही बाब लक्षात घेऊन भारतीय टपाल खात्यानेही आपले ‘ई-कॉमर्स पोर्टल’ सुरू केले आहे  🗣️ पोस्टाच्या या पोर्टलवर ग्राहकांना विविध वस्तू ऑनलाईन पद्धतीने खरेदी करता येतील. म्हणजे आता अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टप्रमाणे ‘इंडिया पोस्ट’ देखील ग्राहक व खरेदीदारांना त्यांच्यासोबत काम करण्याची खरेदीची संधी देणार आहे 🤔  कोणत्या वस्तू मिळणार ? - कपडे, भारतीय पोस्ट उत्पादने, बांगड्या, भेटवस्तू, घरगुती उपकरणे, आणि बास्केट इत्यादी वस्तू मिळणार आहेत  💁‍♂️  अशी करा खरेदी  - सर्वप्रथम पोस्टाच्या Ecom.Indiapost.Gov.In च्या अधिकृत ई-कॉमर्स वेबसाइटवर जा - नंतर ‘होम पेज’ वर ‘माय अकाउंट’ या ऑप्शनवर क्लिक करा. ▪️ तेथे तुम्हाला Existing User आणि New User असे दोन पर्याय दिसतील. तुम्हाला Register Now हा पर्याय निवडून नोंदणी करावी लागेल. ▪️ नोंदणीसाठी पत्ता, पिन कोड, राज्य, मोबाईल नंबर,व ई...

सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी ! - पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत होणार घट. Govt. Update

📣 सर्वसामान्यांसाठी दिलासादायक बातमी ! - पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत होणार घट Govt. Update 🧐 केंद्र सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील अप्रत्याशित कर कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता आहे.  💁‍♂️  पहा सविस्तर  ✒️ तुम्हाला माहिती असेल, काही महिन्यांपूर्वी कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल 97.40 डाॅलरवर गेली होती. मात्र, या महिन्यात ही किंमत प्रति बॅरल 92.67 डाॅलरवर आली आहे 💰 दरम्यान आता केंद्र सरकारने देशात उत्पादित होणाऱ्या कच्च्या तेलावरील कर 13,300 रुपये प्रति टनावरून 10,500 रुपये केला आहे. अर्थ मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, डिझेलवरील निर्यात शुल्क 13.5 रुपयांवरुन 10 रुपये प्रति लिटर केले आहे.   ✈️ याचबरोबर विमानातील इंधनावरील निर्यात शुल्क 9 रुपयांवरुन 5 रुपये प्रति लिटर केले आहे - तर नवीन दर आजपासून लागू होतील - असेही केंद्र सरकारने म्हटले आहे  📌 दरम्यान पेट्रोल-डिझेलच्या नव्या किमती विषयी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू  😇  पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी होणार...

पालकांसाठी मोठी बातमी ! - विद्यार्थ्यांचा गृहपाठ होणार बंद School Homework Update

🧐 पालकांसाठी मोठी बातमी ! - विद्यार्थ्यांचा गृहपाठ होणार बंद  Govt. Update 🖊️ विद्यार्थी व त्यांच्या पालकांसाठी हि बातमी खुप महत्वाची आहे - शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणार गृहपाठ आता बंद होणार आहे - असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले  ✍️ पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचा गृहपाठ घेणं हे पालकांसाठी खूप अवघड असतं. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गृहपाठाविषयी लवकरच तज्ञांशी चर्चा करुन याबद्दल अंतिम निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.  💁‍♂️  पहा आणखी काय म्हणाले शिक्षणमंत्री ? ● दीपक केसरकर म्हणाले कि, गृहपाठ बंद झाल्यास पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा ताण हलका होऊ शकतो. येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा विचार आम्ही करत आहो   ● मात्र गृहपाठाविषयी आम्ही शिक्षक संघटना, संस्था चालकांशी बोलून यावर काय निर्णय घ्यायचा ते ठरवणार आहोत,  ● दरम्यान, गृहपाठ नसेल तर विद्यार्थी घरी अभ्यास करतील का? असा प्रश्न पालकांना पडला आहे. त्यामुळे या निर्णयावर तज्ञ काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.  📍 तसे याविषयी आणखी काही...

आता व्हीआयपी नंबरसाठी द्यावे लागणार अधिक शुल्क - वाहन धारकांसाठी मोठी बातमी Vehicle Update

😱  आता व्हीआयपी नंबरसाठी द्यावे लागणार अधिक शुल्क - वाहन धारकांसाठी मोठी बातमी Govt. Update 🧐 आता गाडीच्या व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत - कारण राज्य परिवहन विभागाने राज्यातील कार व बाईकच्या ‘व्हीआयपी’ नंबरसाठी शुल्क वाढवण्याचा निर्णय घेला आहे  🤷‍♂️  पहा किती लागणार शुल्क ? ▪️मसूदा अधिसूचनेनुसार, सर्वाधिक मागणी असलेला ‘नंबर 1’ साठी चारचाकी वाहनांना याआधी 4 लाख रुपये शुल्क लागत होते - मात्र आता हा नंबर मिळवण्यासाठी 5 लाख रुपये शुल्क द्यावे लागणार आहे,  ▪️तर दुचाकीसाठी 50 हजार ते 1 लाखापर्यंत पैसे मोजावे लागणार आहेत - राज्यात प्रत्येक रजिस्ट्रेशन सीरीजमध्ये 240 वेगवेगळे नंबर ‘व्हीआयपी नंबर’ म्हणून रजिस्टर्ड आहेत -  ▪️यापैकी 0001, 0009, 0099, 0999, 9999 तसेच 0786 या नंबरला सर्वाधिक मागणी असते. या नंबरसाठी सध्या दीड लाख रुपये शुल्क असून, आता ते अडीच लाख रुपये होणार आहे तसेच,  ▪️तीन चाकी वाहनांसाठी प्रस्तावित शुल्क 20 हजारांपासून 50 हजार रुपयांपर्यंत वाढवले आहे - तर चारचाकी वाहनांसाठी प्रस्तावित शुल्क 70 हजारांहून 1 लाख रुपये करण्यात...

🔖 विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी - आता पाचवीपासून शिकवले जाणार शेती विषयक धडे Govt. Update

  🔖 विद्यार्थी व पालकांसाठी मोठी बातमी - आता पाचवीपासून शिकवले जाणार शेती विषयक धडे  Govt. Update 🧐 अत्याधुनिक शेतीकडे तरुणांचा कल वाढावा, तसेच भविष्यात नोकरी नाहीच मिळाली, तरी शेती व्यवसाय करण्यासाठी भावी पिढी निपुण व्हावी -  🗣️ यासाठी राज्य सरकारने आता शालेय विद्यार्थ्यांना पाचवीपासून ‘शेती’ विषयाचे धडे देण्याचे नियोजन केले आहे - असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले  🤷‍♂️ पहा काय म्हणाले कृषिमंत्री ? ▪️ अब्दुल सत्तार म्हणाले, की महाराष्ट्रात शालेय विद्यार्थ्यांना लवकरच पाचवीपासून शेती (Agriculture) हा विषय शिकवला जाणार आहे. पाचवीपासून बारावीपर्यंत शेती विषय शिकवला जाईल.  ▪️ शालेय विद्यार्थ्यांना शेतीबाबत धडे शिकवण्यासाठी, प्रयोगशाळा म्हणून गावाेगाव असलेल्या सरकारी जागा दिल्या जातील. तसेच यासाठी शिक्षकांनाही याबाबत काही दिवसांचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती मंत्री सत्तार यांनी दिली 🐄 यामध्ये - पिकांवर औषध फवारणी कशी करायची, सरी कशी टाकायची, पेरणी कशी करायची, गायी-म्हशींची निगा कशी राखायची, नवीन अवजारांचा वापर कसा करावा, खतांचा वापर कसा कर...

सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीच्या दरात वाढ - पहा कसे आहेत नवे दर ? Gold Rate Update

📣 सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीच्या दरात वाढ - पहा कसे आहेत नवे दर ? Gold Rate Update ✒️ गुडरिटर्न्स वेबसाईटवर दीलेल्या माहीतीनुसार, आज १५ सप्टेंबरला 24 कॅरेट सोन्याच्या दरात 220 रुपयांनी घट झाली -  😱 तर चांदीच्या दरात किलोमागे 600 रुपयांची वाढ झाली आहे.   🤷‍♂️  कसे आहेत आजचे दर ? 🔰  सोने - 50,400 रुपये प्रति तोळा 🔰  चांदी  - 57,000 रुपये प्रति किलो 🙏  ही माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

💁‍♂️ शेकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - जनावरांना मोफत मिळणार लंपीची लस Govt. Update

💁‍♂️  शेकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - जनावरांना मोफत मिळणार लंपीची लस  Govt. Update 🧐 राज्यात लंपी व्हायरस खूप वेगाने पसरत आहे. आतापर्यंत राज्यात 43 जनावरांचा मृत्यू झाला आहे. हा आजार नियंत्रणार आणण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना जनावरांचे लसीकरण जलद करण्याचे आदेश दिले आहेत.  🗣️ तसेच ही लस जनावरांना पूर्णपणे मोफत दिली जाणार आहे. - असेही पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे   🤷‍♂️  आणखी काय सांगितले पशुसंवर्धन विभागाने ? ▪️ पशुपालन आणि डेअरी विकास विभागाचे राज्य आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी म्हटले आहे की, लंपी त्वचा रोगाच्या नियंत्रणासाठी जनावरांना मोफत लंपीची लस मिळणार असल्याचे सांगितले,  ▪️ आम्ही लसीकरणासाठी 50 लाख कुपी तयार करत आहोत, तसेच पुढील आठवड्यापासून लस सर्वत्र उपलब्ध होईल. 👉  पशुसंवर्धन विभागाने - प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, आतापर्यंत 1,755 गावांमध्ये 5 लाख 51 हजार 120 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. लंपीची लागण झालेल्या 2,664 जनावरांपैकी 1,520 जनावरे उपचारानंतर बरी झाली आहेत.  😇  जनावरांना मोफत ल...

आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय - कॅन्सरच्या उपचाराची औषधे होणार स्वस्त Govt. Update

🔖 आरोग्य मंत्रालयाचा मोठा निर्णय - कॅन्सरच्या उपचाराची औषधे होणार स्वस्त  Govt. Update 🧐 केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने सुधारित औषध यादी जाहीर केली आहे - यामध्ये कॅन्सरसह अन्य महत्वाच्या औषधांच्या किंमतीत घट केल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.  💊 या यादीत तब्बल ३८४ औषधांचा समावेश असून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी ही यादी जाहीर केली आहे. 🤷‍♂️  काय सांगितले आरोग्य मंत्रालयाने ? 🔰 नव्या सुधारित यादी दरानुसार आता अँटिबायोटिक्स, कॅन्सर व इतर प्रतिबंधित लशी स्वस्त होणार आहे. याव्यतिरिक्त अंतःस्रावी, गर्भनिरोधक औषधी, श्वसन व नेत्रविकार संबंधित औषधी -  🔰 तसेच हृदय व रक्तनलिकांच्या आरोग्यासाठी आवश्यक औषधी सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात देण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त मुपिरोसिन, इव्हरमॅक्टिन यांसारखी संसर्गाला प्रतिरोध करणारी औषधे तसेच अन्य ३४ प्रकराची औषधे देखील स्वस्त होणार आहे.  🔰 नव्या यादीत औषधांची २७ श्रेणीमध्ये मांडणी केली गेली असून, यामधील जास्तीत जास्त औषधी ही गंभीर व अतिगंभीर आजारांवर गुणकारीरीत्या कार्य करणारी आहे.  😇...

राज्यात माॅन्सूनचा कहर कायम ! - पुढील 3 दिवस अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा. Wheather Update

🌍  राज्यात माॅन्सूनचा कहर कायम ! - पुढील 3 दिवस अनेक जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा  Wheather Update 🌧️ सध्या परतीच्या वाटेवर निघालेला माॅन्सून कोकण, घाट परिसरात सक्रिय झाला आहे. त्यामुळे राज्यात पुढील 3 ते 4 दिवस पावसाचा जोर कायम राहील.  🗣️ यामध्ये विशेषत: कोकण व मध्य महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 🤷‍♂️  कशी असणार पुढील हवामान स्थिती ? ● १५ सप्टेंबरला  – मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये ‘ऑरेंज अलर्ट’ जारी, तर रत्नागिरी व सिंधुदुर्गात जिल्ह्यात मध्यम पावसाचा अंदाज आहे  ●  १६ सप्टेंबरला – पालघरमध्ये ऑरेंज अलर्ट,  तर मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग सरासरी पावसाची शक्यता आहे तर  ●  १७ सप्टेंबरल –  रायगड आणि रत्नागिरी वगळता इतर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी राहील - असे हवामान तज्ञ के. एस. होसाळीकर यांनी सांगितले  🙏 दरम्यान हवामानाविषयी  - असलेले हि माहिती प्रत्येक शेतकऱ्यांसाठी, खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

रेशन कार्ड संदर्भात नवीन नियम जारी - प्रत्येकाने वाचा. Govt. Update

😱 रेशन कार्ड संदर्भात नवीन नियम जारी - प्रत्येकाने वाचा Govt. Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, केंद्र सरकारने गोरगरीबांना स्वस्त दरात धान्य मिळावे म्हणून हि योजना सुरु केली होती.  ✒️ मात्र, अनेक सरकारी कर्मचारी फ्रॉड करुन रेशन कार्डवर स्वस्तात धान्य मिळवत असल्याचे समोर आले आहे - त्यामुळे केंद्र सरकारने अशा रेशन कार्ड संदर्भात नवीन नियम जारी केले आहेत  💁‍♂️  पहा कसे आहेत नियम ? 📙 केंद्र सरकार लवकरच कर्मचाऱ्यांची किमान उत्पन्न मर्यादा वाढवण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचा समावेश दारिद्रयरेषेखालील यादीत होणार नाही. 📢 अशा कर्मचाऱ्यांना रेशन कार्डवर मिळणारे लाभ सोडावे लागणार आहेत. उत्पन्न मर्यादा वाढल्यावरही रेशनवरील लाभ घेतल्यास, अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल  🤔  कोणावर होणार कारवाई ? ▪️ दारिद्रयरेषेखाली येत नसल्यास ▪️ सर्व सुख-सोयी असतानाही रेशनवरील लाभ घेतल्यास ▪️ कुटुंबातील व्यक्ती सरकारी नोकरीत असेल तर ▪️ कुटुंबाचं दरमहा उत्पन्न 3000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास ▪️ एपीएल (APL) योजनेसाठी दरमहा उत्पन्न 10 हजारांपेक्षा अधिक नसावे ▪️ एकापेक्...

राज्य सरकारचा मोठा निर्णय ! - लम्पी व्हायरसमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास, पशुपालकांना नुकसान भरपाई मिळेल. Govt. Update

🔖  राज्य सरकारचा मोठा निर्णय ! - लम्पी व्हायरसमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास, पशुपालकांना नुकसान भरपाई मिळेल Govt. Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, गेल्या काही दिवसांपासून राज्यातील जनावरांवर लम्पी चर्मरोगाचे संकट आले आहे - यामध्ये अनेक जनावरांचा मृत्यू झाल्याने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे  ✒️ ‘लम्पी’ चर्मरोगाचा प्रादुर्भावाने जनावरांचा मृत्यू झाल्यास, पशुपालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.  🗣️ त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. 🤷‍♂️  काय सांगितले राज्य सरकारने ? 🐂 लम्पी व्हायरसमुळे जनावरांचा मृत्यू झाल्यास, संबंधित शेतकरी वा पशुपालकांना राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणातील निकषांनुसार राज्य शासनाच्या निधीतून भरपाई दिली जाणार आहे.. 🏢 तसेच या निर्णयाच्या अंमलबजावणी करण्यासाठी संबधित जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाणार आहे. 💰 जिल्हा नियो...

राज्यात लंपी व्हायरसचा धोका वाढला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंने दिले निर्देश Farmer Update

😱 राज्यात लंपी व्हायरसचा धोका वाढला - मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंने दिले निर्देश Farmer Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, लंपी व्हायरस विषयी आपण याआधी सुद्धा माहिती घेतली होती - दरम्यान राज्यात जनावरांमध्ये लंपी व्हायरसचा धोका वाढत आहे. ✒️ त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे तसेच जनावरांमध्ये लंपीच्या संक्रमणाला रोखण्याचे निर्देश दिले आहेत.  💁‍♂️  पहा काय म्हणाले मुख्यमंत्री ?  🏥 ज्या जिल्ह्यांमध्ये या आजाराची नोंद झाली त्या जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी आपापल्या भागात या आजाराबाबत जनजागृती मोहीम राबवून लोकांना तत्काळ मदत उपलब्ध करून देण्यास सांगितले.  📞 त्याचबरोबर मदतीसाठी जिल्हास्तरावर 18002330418 हा टोल फ्रीनंबर तर राज्यस्तरावर 1962 हा कॉल सेंटर टोल फ्री नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे  🏠  दरम्यान गेल्या महिन्यात राज्यात लंपी व्हायरसने 22 जनावरांचा मृत्यू झाला. यामध्ये जळगाव, अहमदनगर, अकोला, धुळे, पुणे, लातूर, औरंगाबाद, बीड, सातारा, बुलढाणा, अमरावती, उस्मानाबाद आणि कोल्हापुर जिल्ह्यातील 133 गाव...

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - देशात लंपी व्हायरसचा कहर 58 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू. Breaking Update

🐄 शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! - देशात लंपी व्हायरसचा कहर 58 हजारांहून अधिक गायींचा मृत्यू Breaking Update 🪸 लंपी व्हायरसने देशभरात 58 हजारांहून अधिक गायींचा बळी घेतला आहे. आतापर्यंत 16 राज्यांमध्ये हा आजार पसरला आहे. राजस्थान हे लंपी व्हायरसने सर्वाधिक प्रभावित राज्य आहे.  ✒️ दरम्यान या आजाराचे लक्षणे व त्यांचे उपाय याविषयी आपण सविस्तर जाणून घेऊ  🤷‍♂️  लंपी व्हायरसने लक्षणे  - लंपी विषाणू हा गुरांचा संसर्गजन्य रोग आहे. त्याला कॅप्री पॉक्स व्हायरस असेही म्हणतात. डास, माश्या, उवा आणि कुंकू इत्यादी या रोगाचे वाहक म्हणून काम करतात.  ▪️ तसेच दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनानेही लंपी विषाणूचा संसर्ग पसरतो, या विषाणूची लागण झालेल्या प्राण्यांच्या त्वचेवर गुठळ्या तयार होतात, त्यानंतर त्यांना फोड येतात.  ▪️ याचबरोबर गुरांना ताप येणे, नाक वाहणे, जास्त लाळ गळणे आणि डोळे दिसणे ही इतर लक्षणे आहेत.  👉  आजारावरील उपाय - या आजारावर कोणताही विशिष्ट उपचार उपलब्ध नाही परंतु त्याचे निदान म्हणून गोटपॉक्स लस वापरली जात आहे.  ▪️ या लसीचा डोस संसर्गाशी लढण्यासाठी...

राज्यात 'मुख्यमंत्री किसान योजना' होणार लागू - शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार सहा हजार रुपये अनुदान Govt. Update

👨‍🌾 राज्यात 'मुख्यमंत्री किसान योजना' होणार लागू - शेतकऱ्यांना वर्षाला मिळणार सहा हजार रुपये अनुदान  Govt. Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, केंद्र सरकारने 2018 ला शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान किसान योजना सुरू केली होती. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून दरवर्षी शेतकऱ्यांच्या खात्यात सहा हजार रुपये जमा केले जात होते  👉 दरम्यान आता राज्यात देखील  मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या योजनेअतर्गंत शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये अनुदान मिळणार आहे.  💰 त्यामळे आता शेतकऱ्यांना दरवर्षी १२ हजार रुपये अनुदान मिळणार आहे - दरम्यान राज्यात ही योजना लवकरच लागू केली जाणार आहे. अशी घोषणा राज्य सरकारने केली आहे.  👩‍💻 तसे या योजनेविषयी आणखी काही अपडेट आले तर आम्ही तुमच्या पर्यंत नक्कीच पोहचवू  ✒️  दरम्यान राज्य सरकारने - केलेली हि घोषणा सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय - प्रत्येकाने वाचा Govt Update

👌   अपघात रोखण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय - प्रत्येकाने वाचा  Govt. Update ⚠️ केंद्र सरकारने रस्ते अपघात रोखण्यासाठी काही आदेश जारी केले आहेत - नव्या आदेशानुसार यापुढे चारचाकी गाड्यांमध्ये बसणाऱ्या प्रत्येकाला सीट बेल्टचा वापर करणे सक्तीचे केले आहे 🗣️ तसेच कारमध्ये 6 एअरबॅगच्या सक्तीसोबत अनेक महत्वाचे निर्णय केंद्र सरकारने घेतले आहेत. सध्या असलेल्या वाहतूक नियमांचा अभ्यास करून त्यात गरज पडल्यास आवश्यक ते आणखी बदल देखील करण्यात येतील - असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले  💁‍♂️  आणखी काय म्हणाले नितीन गडकरी ? ▪️ बऱ्याचदा देशातील कारचे उत्पादन करणाऱ्या कंपन्या परदेशात निर्यात करण्यासाठी वाहनाची निर्मिती करतात तेव्हा त्या गाड्यांमध्ये 6 एअरबॅग्स असतात.  ▪️ मात्र जेव्हा याच गाड्यांचे उत्पादन देशात विक्रीसाठी केले जाते तेव्हा या गाड्यांमध्ये फक्त चारच एअरबॅग असतात. यामध्ये कार उत्पादक कंपन्यांची याबाबत विचारणा केली असता - ▪️ ते तेव्हा खर्च वाढत असल्याचे कारण सांगितात. पण मला वाटते की कंपन्यांचा हा दावा चुकीचा आहे. कारण एक एअरबॅग लावण्यासाठी अवघा 9...

रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी ! - आता मोफत उपचारासाठी मिळणार आयुष्मान कार्ड Breaking Update

🎯 रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी ! - आता मोफत उपचारासाठी मिळणार आयुष्मान कार्ड  Breaking Update 🧐 केंद्र सरकारने सर्व अंत्योदय (बीपीएल) कार्डधारकांच्या मोफत उपचारासाठी आयुष्मान कार्ड बनवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी जिल्हा व तहसील स्तरावर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.  🗣️ या मोहिमेअंतर्गत अंत्योदय (बीपीएल) कार्डधारकांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसाठी आयुष्मान कार्ड बनवण्यात येतील - असे केंद्र सरकारने सांगितले  🤷‍♂️  आणखी काय सांगितले केंद्र सरकारने ?  👨‍💻 जनसुविधा केंद्रांवरही शासनाकडून ही सुविधा उपलब्ध करून दिली जात आहे. तुम्ही तुमचे रेशन कार्ड दाखवून जन सुविधा केंद्रात आयुष्मान कार्डसाठी अर्ज करू शकता.  ✒️ या मोहिमेअंतर्गत सर्व अंत्योदय कार्डधारकांची आयुष्मान कार्ड बनवली जाणार आहेत. सध्या ज्या अंत्योदय कार्डधारकांकडे आयुष्मान कार्ड उपलब्ध नाही. ते संबंधित विभागाला भेट देऊन त्यांची प्रक्रिया पूर्ण करू शकतात.  🏥 पात्र लाभार्थी कार्ड मिळाल्यानंतर जनसेवा केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, आयुष्मान पॅनलशी संलग्न खाजगी रुग्णालय किंवा जिल्हा ...

SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! - आता Whatsapp वर मिळणार अकाऊंटची सर्व माहिती. Banking Update

🏦 SBI च्या ग्राहकांसाठी मोठी बातमी ! - आता Whatsapp वर मिळणार अकाऊंटची सर्व माहिती Banking Update 🧐 स्टेट बँक ऑफ इंडियाने आपली व्हॉट्सॲप बँकिंग सेवा सुरू केली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक आणि शेवटच्या पाच व्यवहारांचे मिनी स्टेटमेंट पाहता येईल  ✨ या नवीन सुविधेमुळे ग्राहकांना छोट्या कामांसाठी बँकेत जावे लागणार नाही. दरम्यान एसबीआयची व्हॉट्सॲप बँकिंग सेवा वापरण्यासाठी, ग्राहकांना प्रथम त्यांचे खाते नोंदणीकृत करणे आवश्यक आहे. 💁‍♂️ अशी करा नोंदणी  - SBI WhatsApp बँकिंग सेवेमध्ये बँक खाते नोंदणी करण्यासाठी WAREG A/C NO (+917208933148) वर SMS पाठवा. नोंदणी पूर्ण झाल्यावर, आपल्याला SBI ची WhatsApp बँकिंग सेवा वापरता येईल 🤔  WhatsApp बँकिंग सेवा कशा वापरायच्या - एकदा नोंदणी केल्यानंतर, +919022690226 या क्रमांकावर WhatsApp वरून HI मॅसेज पाठवा. त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणताही एक निवडा. 💫 खाते शिल्लक, मिनी स्टेटमेंट आणि व्हॉट्सॲप बँकिंगमध्ये नोंदणी करा इत्यादी  😇  प्रत्येक SBI च्या ग्राहकांसाठी - ही बातमी खूप महत्वाची आहे - आपण...

वाहनांच्या सुरक्षेबाबत नितीन गडकरी यांची मोठी घोषणा - पहा काय म्हणाले ? Govt. Update

📣 वाहनांच्या सुरक्षेबाबत नितीन गडकरी यांची मोठी घोषणा - पहा काय म्हणाले ? Govt. Update 🧐 केंद्र सरकार ऑक्टोबरपासून वाहन कंपन्यांना आठ आसनी वाहनांमध्ये किमान सहा 'एअरबॅग' असणे अनिवार्य करण्याचा विचार करत आहे.  🗣️ खासगी वाहनांमधील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे पाऊल उचलले आहे, अशी माहीती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.  🤷‍♂️  आणखी काय म्हणाले नितीन गडकरी ? 🚗  ड्रायव्हरच्या सीटप्रमाणेच मागील सीटवर सीट बेल्टचा अलार्म असेल. कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास एक हजाराचा दंड आकारला जाईल. तसेच हा नियम सर्वांसाठी अनिवार्य आहे 💵 तुम्हाला माहिती असेल, मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट न घातल्याने वाहतूक पोलिस दंड आकारत नाहीत.  ✒️ मात्र आता मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीट बेल्ट लावणे बंधनकारक असणार आहे - असे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी म्हणाले  😇  दरम्यान सर्व वाहन धारकांसाठी - ही माहिती खूप महत्वाची आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

शेतकऱ्यांनो सावधानPM किसान योजनेचे पैसे होतील बंद जाणून घ्या सविस्तर

शेतकऱ्यांनो सावधान PM किसान योजनेचे पैसे होतील बंद शेवटचे दोन दिवस शिल्लक👇👇 kyc झाली का चेक करा👇👇 https://krushinews24.in/pm-kisan-ekyc-online/

महावितरण मध्ये 100 जागांसाठी भरती - पहा सविस्तर

🎯 *महावितरण मध्ये 100 जागांसाठी भरती - पहा सविस्तर*  Govt. Job Updates   👤 *पदाचे नाव* - प्रशिक्षणार्थी  🎓 *शैक्षणिक पात्रता* - ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन) 🧐 *वयाची अट* - जाहिरात पहा  🌎 *नोकरी ठिकाण* - हिंगोली 💰 *अर्जासाठी फी* - फी नाही ⏲️ *अर्जाची शेवटची तारीख* - 09 सप्टेंबर 2022  ✒️ *अर्ज पाठविण्याचा पत्ता* - मंडळ कार्यालय, विद्युत भवन, हिंगोली 📃 *सविस्तर जाहिरात pdf* - bit.ly/3cRZ9AX 🖥️ *ऑनलाईन अर्ज* - www.apprenticeshipindia.gov.in 🙂  सरकारी जॉब अपडेट - सर्व विद्यार्थ्यांसाठी नक्कीच खूप महत्वाचे आहे - आपण थोडासा वेळ काढून  - इतरांना देखील अवश्य शेअर करा

😱 रेल्वेचे तिकीट नेमके कसे ठरवले जाते ! - जाणून घ्या महत्वाचे नॉलेज अपडेट Knowledge Updates

😱 रेल्वेचे तिकीट नेमके कसे ठरवले जाते ! - जाणून घ्या महत्वाचे नॉलेज अपडेट  Knowledge Updates 🚂 अशी कुठलीही व्यक्ती नसेल ज्यांनी रेल्वेचा प्रवास केला नसेल - मात्र रेल्वेचे तिकीट कसे ठरवले जाते - याबाबत प्रत्येकाला प्रश्न पडला असेल  💰 याविषयी आपण आजच्या मॅसेज मध्ये जाणून घेऊ  - यामध्ये आपण भाड्याचा निकष आणि किलोमीटरनुसार फरक , या दोन गोष्टी जाणून घेऊ  💁‍♂️  भाड्याचा निकष कसे ठरते ● तसे पाहिले तर भारतीय रेल्वेद्वारे विभिन्न प्रकारच्या रेल्वे धावतात - स्लीपरमध्ये कमी तर एसीमध्ये अधिक भाडे आकारले जाते - सुविधांनुसार भाडे दरात कमी अधिक प्रमाण दिसून येते ● विशेष रेल्वे गाड्यांमध्ये गरीब रथ, राजधानी, शताब्दी, दुरांतो, वंदे भारत, तेजस, हमसफर, गतिमान, अंत्योदय, जन शताब्दी, इत्यादी ट्रेन यांचा समावेश होतो. ● याव्यतिरिक्त रिझर्व्हेशन शुल्क, केंद्रीय कर, यांचा देखील समावेश होतो - या सर्वांच्या एकत्रिकरणातून रेल्वेच्या भाड्याचा दर ठरविला जातो 🛣️  किलोमीटरचा फरक ● रेल्वे तिकीटात किलोमीटरनुसार फरक खूप महत्वाचा असतो - किलोमीटर च्या वेगळंवेगळ्या श्रेणी राहतात  , या...

ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमामध्ये मोठा बदल - प्रत्येकाने वाचा Govt. Update

🎯 ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्याच्या नियमामध्ये मोठा बदल - प्रत्येकाने वाचा  Govt. Update 📝 आपण जर ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्याचा किंवा रिन्यू करत असाल, तर ही बातमी आपल्यासाठी खूप महत्वाची आहे - केंद्र सरकारने ड्रायव्हिंग लायसन्स बनविण्याच्या नियमांत बदल केला आहे  🚗 नव्या नियमानुसार आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी आरटीओ मध्ये फेऱ्या मारण्याची गरज  नाही  🤷‍♂️  पहा काय सांगितले केंद्र सरकारने ?  ● केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या नव्या नियमानुसार - आपल्याला ड्रायव्हिंग लायसन्स बनवण्यासाठी RTO मध्ये जाऊन कसल्याही प्रकारची ड्रायव्हिंग टेस्ट देण्याची गरज नाही ● तसेच ड्रायव्हिंग लायसेन्स बनविण्यासाठी आरटीओमध्ये टेस्ट देण्याची वाट पाहावी लागणार नाही - यासाठी आपण कोणत्याही मान्यताप्राप्त ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्ससाठी नोंदणी करू शकता ● तेथून ट्रेनिंग घेतल्यानंतर, आपल्याला तेथेच टेस्ट देखील पास करावी लागेल. यानंतर, टेस्ट पास करणाऱ्यांना ट्रेनिंग स्‍कूलकडून एक प्रमाणपत्र देण्यात येईल आणि याच प्रमाणपत्राच...

सप्टेंबरमधील पावसाचा अंदाज जाहीर - हवामान विभागाचा अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी. Wheather Update

🌍 सप्टेंबरमधील पावसाचा अंदाज जाहीर - हवामान विभागाचा अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी Wheather Update 🧐 सप्टेंबरमध्ये राज्यातील अनेक भागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. संपूर्ण देशात या कालावधीत सरासरीच्या तुलनेत 109 टक्के पाऊस होईल, असे भारतीय हवामान विभागाने जाहीर केलं आहे. 💁‍♂️  या जिल्ह्यांना अलर्ट जारी ⛈️ पुढील दोन दिवस राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे 💫 तर सप्टेंबर महिन्यात मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकण विभाग, पश्चिम महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा, पूर्व विदर्भात शेवटच्या टप्प्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे.  👉 याचबरोबर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, पुणे, सोलापूर, नाशिक, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांनाही सतर्कतेचा इशारा दिला आहे. 🙏  हवामान अपडेट प्रत्येक शेतकऱ्यांसाठी  - खूप महत्वाचे आहे - आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

SBI कडून कॅशबॅक कार्ड लाँच - पहा ग्राहकांना कोणत्या सुविधा मिळणार ? Banking Update

🎯 SBI कडून कॅशबॅक कार्ड लाँच - पहा ग्राहकांना कोणत्या सुविधा मिळणार ? Banking Update 🧐 देशातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांसाठी कॅशबॅक नावाचे क्रेडिट कार्ड लाँच केले आहे.  ✒️ या कार्डद्वारे ग्राहकांना कोणत्याही ऑनलाइन शॉपिंग साइटवर 5 टक्के कॅशबॅक मिळणार आहे. तसेच, यात व्यापाऱ्यांवर कोणतेही बंधन असणार नाही. 💁‍♂️  पहा सविस्तर  ▪️ यामध्ये ग्राहकाला 1,000 रुपयांपेक्षा कमी खरेदीवर 1 टक्के कॅशबॅक मिळेल. तर1000 रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर 5 टक्के कॅशबॅक मिळेल.  ▪️ या कार्डमध्ये ग्राहकांना ऑटो क्रेडिट कॅशबॅक सुविधा मिळते. अशा परिस्थितीत खरेदी केल्यानंतर दोन दिवसांत कॅशबॅकची रक्कम तुमच्या खात्यात जमा होईल. ▪️ दरम्यान याकार्डसाठी ग्राहकांना काही शुल्क भरावे लागणार आहे - असे कार्ड लाँच करताना बँकेचे एमडी आणि सीईओ राम मोहन राव अमारा म्हणाले  💰  शुल्क किती लागणार ? - एसबीआय कॅशबॅक कार्ड खरेदी केल्यावर ग्राहकांना एका वर्षात 999 रुपये नूतनीकरण शुल्क भरावे लागेल. या कार्डद्वारे ग्राहक दरवर्षी 2 लाख रुपयांपर्यंत खरेदी करू शकतात. 💫 मात्र ग्राहकां...

💰 सोने चांदीच्या दरात पुन्हा घसरण - कसे आहेत आजचे दर ? Gold Rate Update

  💰 सोने चांदीच्या दरात पुन्हा घसरण - कसे आहेत आजचे दर ? Gold Rate Update 🧐 तुम्हाला माहिती असेल, मागील काही दिवसापासून सोने चांदीच्या दरात मोठी घसरण होत आहे.   💰 दरम्यान, आज सोन्याच्या दरात 110 रुपयांनी घसरण झाली, तर चांदीच्या दरात किलोमागे 700 रुपयांची वाढ झाली आहे.   🤷‍♂️ कसे आहेत आजचे दर ? 🔰 सोने - 50,620 प्रति तोळा 🔰 चांदी - 52,300 प्रति किलो 👌 सोने चांदीच्या दरात पुन्हा घट झाली - ही माहिती आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा

आता व्हॉट्सअँपवर मिळणार मेट्रोचे तिकीट - जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया Metro Updates

📣 आता व्हॉट्सअँपवर मिळणार मेट्रोचे तिकीट - जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया Metro Updates 🚅 मेट्रो-१ च्या प्रशासनाने यापूर्वी  तिकीट काढण्यासाठी - पेपर क्यूआर तिकीट प्रणाली आणली होती  - तर आता तिकीट व्हॉटसॲपद्वारे मिळणार आहे 🌎 दरम्यान यामुळे जगात पहिल्यांदाच व्हॉट्सॲपद्वारे ई-तिकीट देण्यास सुरुवात केली जाणार आहे - असे मुंबई मेट्रो-१ च्या प्रशासनाने सांगितले आहे  💁‍♂️  पहा कशी आहे पद्धत ?  🔰 या पद्धत मध्ये , व्हॉट्सॲप तिकिटासाठी प्रवाशांना ९६७०००८८८९ या क्रमांकावर संदेश पाठवावा लागणार आहे 🔰 नंतर त्यांना ओटीपी क्रमांक व्हॉटसॲपद्वारे मिळणार - तिकीट खिडकीवर हा ओटीपी क्रमांक सांगून रोख पैसे देताच  - व्हॉट्सॲपवर ई-तिकीट मिळणार 🙏    मेट्रोचे तिकीट आता व्हॉटसॲपद्वारे मिळणार  - प्रवाशांसाठी ही बातमी महत्वाची आहे - आपण इतरांना देखील शेअर करा

राज्यात पुढील दोन दिवस विविध भागात पाऊस - हवामान विभागाचा अंदाज ? Weather update

🌏 राज्यात पुढील दोन दिवस विविध भागात पाऊस - हवामान विभागाचा अंदाज ? Weather update 💫 राज्यात पावसानं काही दिवस दडी मारल्यानंतर पुन्हा एकदा एन्ट्री केली आहे. हवामान विभागाने राज्यात पुढील दोन दिवस विविध भागात पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.  🤷‍♂️  कुठं पडणार पाऊस ? - कोकणातील रत्नागिरीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यांचा समावेश आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूरसह कोल्हापूर जिल्ह्यांत देखील पावसाचा यलो अलर्ट दिला आहे.  🌧️ तसेच मराठवाड्याच्या औरंगाबाद, बीड, लातूर, उस्मानाबादसह नांदेड जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे 🙂  हवामान अपडेट -  प्रत्येक नागरीकांसाठी खूप महत्वाचे आहे, आपण इतरांना देखील शेअर करा

दिलासादायक बातमी ! - आज LPG गॅस सिलिंडर च्या किंमतीत झाली घट. LPG Updates

🧐 दिलासादायक बातमी ! - आज LPG गॅस सिलिंडर च्या किंमतीत झाली घट LPG Updates 🏺 आज १ सप्टेंबरला LPG सिलिंडरचे नवीन दर जाहीर झाले - यानुसार आज व्यावसायीक सिलिंडर 92.5 रुपयांनी स्वस्त झाले आहे - तर घरगुती गॅस सिलिंडर मध्ये कोणताही बदल झालेला नाही   💁‍♂️  कसे आहेत नवे दर 🔰  व्यावसायिक सिलेंडर - 1,844 रुपये   🔰  घरगुती सिलेंडर  - 1002.50 रुपये   📌    LPG सिलिंडरच्या - नवीन किमती आपण इतरांना देखील शेअर करा